Headlines

SIR मुळे ‘सर’ व्यग्र; निरक्षरांचा शोध घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जुंपणार:सोलापूर मनपाचा फतवा; 1.82 लाख विद्यार्थी 7,205 निरक्षर शोधून काढणार



मतदार याद्या फेरसर्वेक्षणाचे (एसआयआर) काम सध्या जोरात सुरू असून सोलापूर शहरातील शिक्षक या कामांत व्यग्र आहेत. त्यामुळे शहर व जिल्ह्यातील ७ हजार २०५ निरक्षरांचा शोध घेण्यासाठी शिक्षण विभागाने मनपाला आदेश दिले आहेत. आता हे टार्गेटही पूर्ण करण्यासाठी सर

.

आपल्या घरातील, नातेवाईकांमधील, शेजारी अथवा परिसरातील १५ वर्षांवरील लिहिता- वाचता न येणाऱ्या व्यक्तींची माहिती या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना द्यावी. त्यानंतर ही माहिती मुख्याध्यापकांमार्फत पुढे पाठवून ‘उल्लास’ ॲपवर नोंदवली जाणार आहे. यानंतर या निरक्षरांना नवसाक्षरता अभियानात सहभागी करुन घेतले जाईल.

ग्रामीण भागात मात्र शिक्षक करतात पाहणी

निरक्षरांच्या शोध मोहिमेसाठी आम्ही ग्रामीण भागात विद्यार्थ्यांकडून मदत घेतली नाही. आमच्याकडे शिक्षकच हे काम करीत आहेत. ते घरोघरी जाऊन निरक्षर लोकांची माहिती घेत आहेत. -विशाल मुळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी

निरक्षरांना अक्षर ओळख, विद्यार्थ्यांना मानधन

मोहिमेत केवळ वाचन- लेखन शिकवण्यापुरते उद्दिष्ट मर्यादित राहणार नाही. १० निरक्षरांमागे एक स्वयंसेवक नेमण्याचे नियोजन असून मोबाइल कसा वापरायचा, पैशांची देवाणघेवाण कशी करायची यासह आवश्यक जीवन कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे या कामासाठी शासनाकडून स्वयंसेवकांना मानधनही दिले जाणार असून, स्वयंसेवक म्हणून विद्यार्थी सहभागी झाल्यास त्यांनाही मानधन मिळणार आहे.

शिक्षकांना अनेक कामे, म्हणून विद्यार्थ्यांची मदत

सध्या शिक्षकांना एसआरआयचे काम आहे. शिवाय अन्य काही प्रशासकीय स्तरावरील कामेही लावली जात आहे. अशा परिस्थितीत निरक्षर शोधणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांच्या मदतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. -मल्हारी माने, प्रशासनाधिकारी, मनपा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *