पुण्यातील गणेशोत्सवात डीजे आणि कर्णकर्कश ध्वनिप्रदूषणाविरोधात भूमिका घेणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर टिळक रस्त्यावरील कशाळे चौकात हल्ला झाल्यानंतरही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. एका वृत्तवाहिनीला थेट मुलाखत देत असताना अचानक एका माथ
.
सवंग प्रसिद्धीसाठी झालेला हल्ला
“तुम्ही मला प्रश्न विचारत असताना अचानक एक वेडा आला आणि त्याने हल्ला केला. मी नि:शस्त्र होतो आणि पोलिसांकडेही रिव्हॉल्व्हर नव्हते हे पाहून त्याने हे कृत्य केले,” असा आरोप बापट यांनी केला. केवळ सवंग प्रसिद्धीच्या हव्यासापोटी हा हल्ला करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुन्हा सुभाषित ऐकवत टोकदार टोला
आपल्या भूमिकेवर बोलताना त्यांनी पुन्हा एकदा त्या चर्चित संस्कृत श्लोकाचा संदर्भ दिला: “घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम्” (मडके फोडावे, वस्त्र फाडावे किंवा गाढवावर बसावे; पण कोणत्याही प्रकारे प्रसिद्ध व्हावे). हल्लेखोराची मानसिकता ही केवळ प्रसिद्धी मिळवणाऱ्या अशाच एका माथेफिरूसारखी असल्याची टीका त्यांनी केली.
झॉम्बीसोबत कसा युक्तिवाद होणार?
हल्लेखोरावर कठोर कारवाईची मागणी करताना बापट म्हणाले, “मुद्द्याचे उत्तर गुद्द्याने द्यायचे नसते, हे त्याला शिकवले पाहिजे. या सगळ्या घटनेचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहे. पोलिसांनी त्या आधारे कारवाई करावी आणि त्याला पोलीस ठाण्यात नेऊन चांगला चोप दिला पाहिजे, कारण अशा लोकांना सरळ सांगून समजत नाही. त्याच्याशी काय युक्तिवाद करणार? झॉम्बीसोबत कोणी युक्तिवाद करतो का?” असा संतप्त सवाल त्यांनी केला.

भूमिकेवर ठाम, उत्सवाला विरोध नाहीच
“उत्सव साजरा करण्यास आमचा अजिबात आक्षेप नाही. सार्वजनिकरीत्या उत्सव साजरा करताना ध्वनिप्रदूषण होणार नाही आणि वाहतुकीला अथवा सर्वसामान्य नागरिकांना अडथळा होणार नाही, एवढीच खबरदारी घ्यावी, ही माझी साधी व कायदेशीर मागणी आहे. माझी भूमिका योग्य आहे हे मला ठाऊक असल्याने मी त्यावर शेवटपर्यंत ठाम राहणार,” असे त्यांनी निक्षून सांगितले.
दरम्यान, या घटनेनंतर पुणे पोलिसांनी हल्लेखोराला तत्काळ ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. शांततेत आपले मत मांडणाऱ्या नागरिकावर भररस्त्यात असा भ्याड हल्ला झाल्याने पुणेकरांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
महापालिकेच्या बैठकीतील आक्रमक भूमिका
पुणे महापालिकेने आयोजित केलेल्या गणेशोत्सवपूर्व नियोजन बैठकीत बापट यांनी डीजेच्या भिंती, लेझर आणि कर्णकर्कश आवाजाविरोधात परखड भूमिका मांडली होती. “आमचा गणेशोत्सवाला विरोध नाही, पण उत्सवाच्या नावाखाली होणारे ध्वनिप्रदूषण आणि मुख्य रस्ते बंद करून काढल्या जाणाऱ्या विसर्जन मिरवणुकांमुळे रुग्णांना, वृद्धांना व सर्वसामान्यांना होणारा त्रास थांबला पाहिजे,” असे मत त्यांनी प्रभावीपणे मांडले होते.
ध्वनिप्रदूषणाचा लढा तीव्र; मानवाधिकार आयोगाचीही नोटीस
बापट यांनी सुरू केलेल्या या मोहिमेला पुण्यातील अनेक नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. डेक्कन जिमखाना परिसरातील रहिवासी शरद केळकर यांनी पुण्यातील वाढत्या ध्वनीप्रदूषणाविरोधात थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे (NHRC) दाद मागितली आहे. या तक्रारीची दखल घेत मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (MPCB) कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.
शांततापूर्ण व कायदेशीर मार्गाने ध्वनीप्रदूषणाविरोधात भूमिका मांडणाऱ्या एका सुजाण नागरिकावर भरदिवसा अशा प्रकारे गुंडगिरी करून हल्ला झाल्याने पुणेकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलिसांनी हल्लेखोरांवर तत्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.,

हेही वाचा…
पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापटांवर हल्ला: रोहित पवार, सुषमा अंधारेंकडून संताप व्यक्त, तातडीने पोलिस संरक्षणाची मागणी

पुण्यातील गणेशोत्सवात डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला आणि ध्वनिप्रदूषणाला जाहीर विरोध करून राज्यभरात चर्चेत आलेले पर्यावरणप्रेमी विद्यानंद बापट यांना टिळक रस्त्यावरील कशाळे चौकात बेदम मारहाण करण्यात आली आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना अचानक आलेल्या 4 ते 5 तरुणांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. या घटनेमुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी