![]()
नागपूर जिल्ह्यात अनाथ आणि गरजू बालकांना सुरक्षित कौटुंबिक वातावरण मिळावे या उद्देशाने राबवल्या जाणाऱ्या दत्तक प्रक्रियेत मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय दत्तक प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ऑनलाईन प्रक्रियेद्वारे ३ सप्टेंबर २०२६ रोजी सात बालका
.
नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया शासनाच्या नियमांनुसार पार पडली. यामध्ये फ्रान्समधील एका दांपत्याने एका बालकाला दत्तक घेतले.
याशिवाय, मुंबईतील पालकांनी तीन, पुण्यातील पालकांनी दोन आणि वर्ध्यातील पालकांनी एका बालकाला दत्तक घेऊन त्यांना आपल्या कुटुंबात स्थान दिले.
महाराष्ट्रामध्ये ‘कारा’च्या (CARA – Central Adoption Resource Authority) मार्गदर्शक प्रणालीचे ऑनलाईन अपडेट नागपूर येथून करण्यात आले. त्यामुळे दत्तक प्रक्रियेच्या दृष्टीने हा उपक्रम खूप महत्त्वाचा मानला जात आहे.
ऑनलाईन पद्धतीमुळे दत्तक प्रक्रियेत पारदर्शकता, कायदेशीरता, सुलभता आणि कार्यक्षमतेत मोठी वाढ झाली आहे.
यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील मेसरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण, संरक्षण अधिकारी विनोद शेंडे, कायदा व परिविक्षा अधिकारी सुजाता गुल्हाने उपस्थित होते.
श्रद्धानंद दत्तक संस्थेच्या ललिता गावंडे व प्रतिमा दिवाणजी यांच्यासह दत्तक इच्छुक पालक आणि संबंधित अधिकारीही या प्रसंगी हजर होते.
बालकांना संस्थात्मक संगोपनाऐवजी सुरक्षित आणि कौटुंबिक वातावरणात वाढण्याची संधी मिळावी, हा दत्तक प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहे. बालकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
नागपुरातून पार पडलेली ही ऑनलाईन दत्तक प्रक्रिया बाल संरक्षण आणि विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे सकारात्मक पाऊल ठरली आहे. सात बालकांना हक्काचे कुटुंब मिळाल्याने त्यांच्या जीवनाला नवी आशा आणि उज्ज्वल भविष्याची दिशा मिळाली आहे.