- Marathi News
- National
- Army’s Weapons, New Supply Route To China Border, Single Supply To Ladakh Stopped
मुकेश कौशिक | नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

लडाखमधील चीन सीमेवर (एलएसी) भारतीय सैन्य आपली रसद व्यवस्था पूर्णपणे बदलत आहे. एखादा रस्ता, पूल किंवा पुरवठ्याचा मार्ग बंद झाला, तरी शस्त्रास्त्रे, दारूगोळा, इंधन व अन्नाचा पुरवठा अजिबात थांबणार नाही, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. लडाखला देशाशी जोडणाऱ्या मार्गांसोबतच अंतर्गत भागांतही पर्यायी रस्ते तयार केले जात आहेत. सध्या लडाखमध्ये पोहोचण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला श्रीनगर-कारगिल-लेह आणि दुसरा मनाली-लेह.
आता सुमारे २९८ किमी लांबीचा निमू-पदम-दरचा हा मार्ग तिसरा मोठा पर्याय बनत आहे. शिंकुन ला येथे सुमारे ४.१ किमी लांबीची बोगदा योजना पूर्ण झाल्यावर हा मार्ग वर्षभर सुरू राहील. जोजिला बोगद्यामुळे श्रीनगर-कारगिल-लेह मार्गावरून सर्व ऋतूंमध्ये वाहतूक शक्य होईल. लडाखच्या अंतर्गत भागातही अनेक पर्यायी मार्ग तयार केले जात आहेत. यामध्ये हनुथांग-तुरुतुक, खाल्त्से-बटालिक आणि कारगिल-दुमगील मार्गांचा समावेश आहे. खारदुंग ला व बटालिक बोगदा प्रकल्पही प्रगती पथावर आहेत.
२९८ किमीच्या तिसऱ्या मार्गे लडाख गाठता येणार
१. नवी लष्करी व्यवस्था का? एखादा रस्ता, पूल किंवा पुरवठा मार्ग बंद पडला, तरी सैन्यापर्यंत शस्त्रास्त्रे, इंधन, अन्न सामग्रीस सतत पोहोचवण्यासाठी.
२. ‘मल्टी-रूट नेटवर्क’ काय? एका महत्त्वाच्या लष्करी भागापर्यंत पोहोचण्यासाठी एकापेक्षा जास्त रस्ते तयार ठेवणे. एक रस्ता बंद झाल्यास दुसऱ्या मार्गाचा वापर करता येईल.
३. निमू-पदम-दरचा मार्ग का? सुमारे २९८ किमी लांबीचा हा मार्ग हिमाचलच्या बाजूने लडाखला वेगळ्या दिशेने जोडणी मिळेल.
४. जोजिला बोगदाचे महत्त्व? हिवाळ्यात जोजिलात बर्फवृष्टी होते. बोगदा तयार झाल्याने श्रीनगर-कारगिल-लेह मार्गावरून वर्षभर सुलभ वाहतूक शक्य.
५. किती खर्च होत आहे? कारगिल-लेह-लडाख क्षेत्रात सध्या सुमारे १८ हजार कोटी रुपयांच्या रस्ते आणि बोगद्यांच्या प्रकल्पांचे काम सुरू आहे.
६. ‘विंटर स्टॉकिंग’वर काय परिणाम होईल? सध्या हिवाळा सुरू होण्यापूर्वी उंचावरील भागांत अन्न, इंधन आणि इतर साहित्य मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवावे लागते.
७. लडाखची पोहोच पुरेशी? नाही. ती रसद पुढच्या चौकीपर्यंत हवी.म्हणून अंतर्गत रस्ते गरजेचे.
८. या रस्त्यांची गरज का ? डोंगराळ भागात एखादी खिंड, पूल किंवा अरुंद रस्ता बंद झाला, तर पुढचा लष्करी भाग संपर्कहीन होऊ शकतो. दुसरा मार्ग हवा.
९. रसद पुरवठ्याला धोका? होय. आधुनिक युद्धात रस्ते, पूल, इंधन साठे व रसद केंद्र ड्रोनद्वारे लक्ष्य होऊ शकतात. त्यामुळे त्यांची सुरक्षा गरजेची आहे.
१०. २०२० च्या भारत-चीन तणावाचा काय परिणाम? आधी सीमा चौक्यांपर्यंत भर होता. आता पर्यायी रस्ते आहेत.