Headlines

संभाजीनगरच्या कंट्रोल रूममध्ये कॉल आला..‘उद्या औरंगजेबाची कबर फोडणार!’; पोलिसांची तारांबळ:मध्यरात्रीला फोन करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल




‘बजरंग दलाची परवानगी मिळाली असून आता तुमचीही परवानगी मिळाली असे गृहीत धरून उद्या सकाळी आम्ही औरंगजेबाची कबर फोडणारच,’ अशी धमकी देणारा कॉल गुरुवारी (३ सप्टेंबर) पहाटे शहर पोलिस नियंत्रण कक्षाला आला. या प्रकारामुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून खुलताबाद ठाण्यात एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुलताबाद ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल कारभारी गवळी यांच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी मध्यरात्री २:३३ च्या सुमारास नियंत्रण कक्षाला फोन आला. त्याने सुरुवातीला मराठीतून परवानगी मागितली. पोलिसांनी विचारणा करताच, त्याने हिंदीतून बजरंग दलाचा नंबर मागितला. पोलिसांनी नकार देताच, ‘आम्ही उद्या कबर फोडणार हे निश्चित आहे,’ असे आव्हान देऊन फोन ठेवला. पोलिसांची तातडीने कारवाई कायदा व सुव्यवस्था बिघडण्याच्या शक्यतेने नियंत्रण कक्षाने अत्यंत गांभीर्याने दखल घेत लागलीच गुन्हे शाखेच्या रात्र गस्तीवरील कर्मचाऱ्यांना तसेच खुलताबाद पोलिसांनाही तात्काळ अलर्ट केले. हा कॉल जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण करण्यासाठी व शांतता भंग करण्याच्या उद्देशाने केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. स्वतःचे नाव डी. देवकुमार सांगणाऱ्या या कॉलरविरुद्ध खुलताबाद पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *