![]()
सामान्य नागरिकांना कोणत्याही कामासाठी हेलपटे मारायला लाऊ नका नसता अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. तालुक्यातील रखडलेली विकासकामे, नागरिकांच्या तक्रारी आणि विविध शासकीय विभागांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रश्नांना आता गती देण्यासाठी प्रशासनाला ‘अॅक्शन प्लॅन’च्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. पैठण तहसील कार्यालयात आमदार विलास भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत ‘काम करा, वेळेत करा आणि त्याचा परिणाम नागरिकांना दिसला पाहिजे’, असा स्पष्ट संदेश विभागप्रमुखांना देण्यात आला. या बैठकीत केवळ कागदोपत्री कामांचा आढावा न घेता प्रत्येक विभागातील प्रलंबित प्रश्न, त्यामागील कारणे आणि ते मार्गी लावण्यासाठीची पुढील कार्यवाही यावर चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष अथवा विकासकामांमध्ये दिरंगाई सहन केली जाणार नसल्याचे आमदार भुमरे यांनी स्पष्ट केले. बैठकीस तहसीलदार ज्योती पवार, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे, नगराध्यक्ष विद्या भूषण कावसानकर, विनोद बोंबले, भुषण कावसानकर, नगराध्यक्ष जितू परदेशी, बजरंग लिंबोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राजेंद्र बोरकर यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पुढे आमदार विलास भुमरे म्हणाले कि ‘नागरिकांना आपल्या प्रश्नांसाठी शासकीय कार्यालयांचे वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत. प्रत्येक विभागाने नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन त्यांचे वेळेत निराकरण करावे. विकासकामांमध्ये दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय ठेवून पैठणच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न आहे,’ असे आमदार विलास भुमरे यांनी अधिकाऱ्यांना बजावले. यावेळी शहादेव लोहारे, दादा बारे, नंदु कळे, सतिश अंधाळे, फाजल टेकडी, शेखर शिंदे, सह पोलीस निरिक्षक महादेव गोमारे, गट विकास अधिकारी मनोरमा गायकवाड, राजेश कांबळे, नामदेव खरात यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. एकाच छताखाली सर्व विभागांचा आढावा तहसील कार्यालय, पैठण नगरपरिषद, पोलुस विभाग, भूमी अभिलेख, कृषी, आरोग्य, जायकवाडी पाटबंधारे विभाग, वन विभाग, राज्य परिवहन महामंडळ, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यासह विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यात पाणीपुरवठा, रस्ते, शेती, आरोग्य सुविधा, वीज, वाहतूक, शासकीय योजना आणि रखडलेली विकासकामे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. नागरिकांच्या प्रश्नांवर विभागांनी परस्परांवर जबाबदारी ढकलण्याऐवजी समन्वयाने तोडगा काढण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.
Source link
नागरिकांना कोणत्याही कामासाठी हेलपाटे नको:आमदार भुमरेंचे अधिकाऱ्यांना निर्देश, विभागनिहाय जबाबदारी निश्चित करून रखडलेली कामे मार्गी लावण्याचे निर्देश