Headlines

डीजे विरोधी विद्यानंद बापट सोशल मीडियावर हिट;:त्यांच्या अस्खलित शब्दांची तरुणाईला भुरळ




पुण्यातील सार्वजनिक उत्सवांमध्ये डीजेच्या कर्णभेदी ध्वनिविस्फोटाला विरोध केल्यामुळे हल्ला झालेले विद्यानंद बापट सोशल मीडियावर लोकप्रिय ठरत आहेत. या घटनेनंतर त्यांच्या विविध मुलाखतींचे जुने आणि नवे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. बापट यांच्या अस्खलित मराठी आणि संस्कृत भाषेवरील प्रभुत्वाने तरुणाईला भुरळ घातली आहे. त्यांनी विविध मुलाखती व माध्यमांतील वापरलेल्या शब्दांविषयी थोडक्यात… अन्य शब्दप्रयोग न दैन्यं न पलायनम् – दीनता न स्वीकारता व पळ न काढता संकटाचा धैर्याने सामना करणे. }स्खलनस्वातंत्र्य – इतरांच्या अधिकारांना हानी न पोहोचवता स्वतःच्या चुका करण्याचेही व्यक्तीला असलेले स्वातंत्र्य. Â ‘घटं भिन्द्यात्, पटं छिन्द्यात्, कुर्याद् गर्दभरोहणम्…’ (अर्थ – मडके फोडावे, वस्त्र फाडावे किंवा गाढवावर बसावे; पण कोणत्याही मार्गाने प्रसिद्ध व्हावे). बापट यांच्यामुळे चर्चेत आलेले शब्द, कंसात त्याचा अर्थ सवंग प्रसिद्धी (सहज, उथळ किंवा स्वस्त मार्गाने मिळवलेली प्रसिद्धी) }पराङ‌््मुख (एखाद्या गोष्टीपासून दूर राहणारा किंवा पाठ फिरवणारा) }व्यक्तिमाहात्म्य (एखाद्या व्यक्तीचे अवाजवी स्तोम किंवा उदात्तीकरण) } न्यायोचित (न्यायाच्या दृष्टीने योग्य) } खंडन (एखादा दावा तर्काने चुकीचा ठरवणे) } विशद करणे (स्पष्ट व विस्ताराने सांगणे) }समताधिष्ठित समाज (समानतेच्या तत्त्वावर आधारलेला समाज) } प्रप्रमेय (सिद्धान्तातून निष्पन्न होणारा दुय्यम निष्कर्ष ) }कालौघात – काळाच्या प्रवाहात पुढे सरकतो तसतसे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *