Headlines

कोळपिंप्री येथील वीर जवान रोहित पाटील अनंतात विलीन:बोरी नदीपात्रात झाले अंत्यसंस्कार,‘अमर रहे’च्या जयघोषाने परिसर हेलावला‎



हरियाणा राज्यातील हथनीकुंड डॅम येथे पूर बचाव मोहिमेच्या प्रशिक्षणादरम्यान वीरमरण आलेले पॅरा कमांडो, लान्स नायक रोहित नारायण पाटील (काटे) (वय ३०) यांच्या पार्थिवावर कोळपिंप्री येथे शुक्रवारी रात्री अत्यंत शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

.

रोहित पाटील यांना मंगळवारी हरियाणातील यमुनानगर जिल्ह्यातील नियमित बचाव प्रशिक्षण सुरू असताना दुर्घटना घडून त्यांना वीरमरण आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील व ११ महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे.

शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहीद रोहित पाटील यांचे पार्थिव मूळ गावी कोळपिंप्री येथे आणण्यात आले.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील, गटविकास अधिकारी भूषण कदम, डीवायएसपी विनायक कोते, पोलिस निरीक्षक दीपक पाटील, भुसावळ सुभेदार ठाकरे, सरपंच मनीषा सतीश काटे उपस्थित होते.

बोरी नदीपात्रात लष्कर आणि स्थानिक पोलीस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून जवानाला अखेरची मानवंदना देण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, प्रशासकीय अधिकारी तसेच पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते.माजी सैनिकांच्या ‘खान्देश रक्षक ग्रुप’सह स्थानिक तरुणांनी अंत्यसंस्काराच्या व्यवस्थेत पुढाकार घेतला. यावेळी घोषणांनी परिसर हेलावला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *