Headlines

लाडसावंगीत शेतकरी दरबार:वीज समस्येवर तात्काळ तोडगा काढण्याचे आदेश‎




फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील लाडसावंगी येथील महावितरण कार्यालयात आमदार सुहास शिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘शेतकरी दरबार’ आयोजित करण्यात आला होता. पावसाच्या अभावामुळे पिके वाळू लागली असतानाच, सततच्या लोड शेडिंग आणि तांत्रिक अडचणींमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी आमदार शिरसाठ यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या होत्या. या तक्रारींची तात्काळ दखल घेत सिरसाठ यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत या कार्यालयात तातडीची बैठक घेतली. ​या बैठकीत शेतकऱ्यांनी विजेच्या अपुऱ्या आणि खंडित पुरवठ्यामुळे होणाऱ्या नुकसानाची माहिती दिली. शेतातील पिकांना पाणी देणे शक्य होत नसल्याने तातडीने वीज समस्या सोडवण्याची मागणी यावेळी लाडसावंगी पंचक्रोशीतील बळीराजाने केली. ​आमदार सुहास शिरसाठ यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी प्राधान्याने समजून घेत उपस्थित एस.डी.ओ. आणि संबंधित अभियंत्यांना वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आणि स्थानिक समस्या तात्काळ सोडवण्याचे निर्देश दिले. तसेच, महावितरणच्या अधीक्षकांशी दूरध्वनीवरून चर्चा करून ‘अंजनडोह फिटर’चे काम लवकरात लवकर सुरू केले जाईल, असे ठोस आश्वासन शेतकऱ्यांना दिले. ज्या ट्रान्सफॉर्मरवर जास्त भार आहे आणि जिथे अति लोड शेडिंगची समस्या निर्माण होत आहे, अशा ठिकाणी नवीन डी.पी. उपलब्ध करून देण्यात याव्यात, या मागणीचे निवेदन लाडसावंगी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी आमदार शिरसाठ यांनी दिले. यावेळी ऋषी नरवडे, शुभम ढोके, संदीप ढोके, गंगाधर ढोके, सुनील हिवराळे यांच्यासह गावातील कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *