Headlines

अक्कलकोट अन् वेळापूरमध्ये रस्त्यावर ठिय्या‎:मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आंदोलन, वेळापुरात अखंड मराठा समाजातर्फे रास्ता रोको आंदोलन‎




मराठा समाजाच्या न्याय्य हक्कासाठी आणि आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आणि महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी पंढरपूरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने आक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे आंदोलन सोमवारी (दि. ७) रोजी सकाळी १० वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पार पडणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला बळ देण्यासाठी आणि मराठा आरक्षणाचा आवाज बुलंद करण्यासाठी पंढरपूर तालुका व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. प्रतिनिधी | अकलूज मराठा आरक्षण व त्या अनुषंगिक मागण्यांसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाच्या समर्थनार्थ माळशिरस तालुका अखंड मराठा समाजाच्या वतीने वेळापूर येथे एक तासाचे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. माळशिरस तालुका अखंड मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सहा दिवसांचा एल्गार पुकारला असून, त्याचा भाग म्हणून रविवारी सकाळी ११ ते १२ या वेळेत वेळापूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वेळापूर येथील पालखी चौकात आळंदी पंढरपूर या पालखी मार्गावरील ओव्हर ब्रीज व त्याखालील चौकात हे आंदोलन करण्यात आले. याठिकाणी पंढरपूर, इंदापूर, अकलूज व सांगोल्याकडून येणारी-जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. खांद्यावर भगवी उपरणी व हातात भगवे ध्वज घेऊन आलेले आंदोलकांनी पुलाखाली चारही बाजूंनी येणाऱ्या रस्त्यांवर तसेच पुलावर बैठक मारली होती. या दरम्यान जय भवानी जय शिवराय तसेच एक मराठा कोटी मराठा, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहात नाही, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढे हम तुम्हारे साथ हैंच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आंदोलकांनी विहित वेळेत आंदोलन आटोपते घेतले. निवासी नायब तहसीलदार सिद्धार्थ जावीर मंडल अधिकारी संदीप चव्हाण, तलाठी सावता गोरे, तसेच वेळापूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आशिष कांबळे आदी उपस्थित होते. प्रतिनिधी | अक्कलकोट मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी अक्कलकोट सोलापूर राजमार्गावर सकल मराठा संयोजक तथा स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्याध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी सोलापूर ,कर्नाटक आणि मराठवाड्याकडे जाणाऱ्या वाहनाच्या तीन किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या एक मराठा लाख मराठा या घोषणांनी परिसर दणाणून गेला. मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे या मागणीसाठी उड्डाणपुलासह पाच प्रमुख मार्ग एकाच वेळी रोखण्यात आले होते. युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर महिलांचा सहभाग देखील लक्षणीय होता. याप्रसंगी नगरसेवक संजय मोरे (मैंदर्गी) शहर शिवसेनाप्रमुख योगेश पवार , शिवप्रतिष्ठानचे वरूण शेळके, गोपीचंद लोंढे,वंदना टोणपे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी सकल मराठा समाज संयोजक अमोल राजे भोसले, सुरेश सूर्यवंशी, बाबासाहेब निंबाळकर, प्रवीण घाटगे, तम्मा शेळके, मनोज निकम, अण्णासाहेब सुरवसे, सुधाकर गोंडाळ,प्रथमेश पवार, बालाजी पाटील यांच्यासह शहर आणि ग्रामीण भागातील मराठा उपस्थित होते. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने नायब तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. वेळापूर चौकात आंदोलन केल्यामुळे चारही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलन संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात कोंडी होणार हे लक्षात घेऊन आंदोलकांनी स्वत: वाहतूक सुरळीत करून दिली. त्यामुळे वाहनांची गर्दी असतानाही कोंडी झाली नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *