![]()
मागील अनेक वर्षांपासून स्वतंत्र ग्रामपंचायतीअभावी मूलभूत सुविधा व शासकीय योजनांपासून वंचित असलेल्या पांगरी महादेव येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची व ग्रामस्थांची संयुक्त बैठक पार पडली. गावातील प्रलंबित प्रश्ना
.
सामाजिक कार्यकर्ते किशोर देशमुख यांनी गावातील बिकट परिस्थिती जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत वनहद्दीतील शेतरस्ते, पिण्याच्या पाण्याची नवीन विहीर व पाइपलाइन, रस्ते सुधारणा, सौरपंप, पीएम सूर्यघर योजना, पेन्शन योजना आणि वीज समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
ग्रामस्थांना बँकिंग सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी लीड बँक व्यवस्थापकांना पत्र देणार असल्याचे काळे यांनी स्पष्ट केले. बैठकीनंतर अधिकाऱ्यांनी गावात फेरफटका मारून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. बैठकीस गटविकास अधिकारी श्रीमती कारले, कृषी, आरोग्य, वनविभाग व महावितरणचे अधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. किशोर देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
बैठकीस उपविभागीय अधिकारी राम काळे यांच्यासह गटविकास अधिकारी श्रीमती कारले, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बारड, वन विभागाचे कर्मचारी, महावितरणचे शाखा अभियंता, घरकुल योजनेचे विस्तार अधिकारी, तऱ्हाळा ग्रामपंचायतीचे अधिकारी पिंपळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
स्वतंत्र ग्रामपंचायतीची प्रतीक्षा व निधीची अडचण सन २००४ मध्ये गट ग्रामपंचायतीचे विभाजन झाल्यानंतर पांगरी महादेवला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळणे आवश्यक होते. मात्र, अद्याप स्वतंत्र दर्जा न मिळाल्याने गावाचा विकास खुंटला आहे. स्वतंत्र ग्रामपंचायत नसल्यामुळे शासनाकडून मिळणारा विकासनिधी थेट गावापर्यंत पोहोचू शकला नाही. परिणामी ग्रामस्थ रस्ते, पाणी, वीज आणि विविध कल्याणकारी योजनांच्या लाभापासून अनेक वर्षांपासून वंचित राहिले आहेत.