Headlines

बीएनएचएसच्या निसर्ग मंडळातर्फे प्रशिक्षण कार्यशाळा:जैवविविधतेविषयी जागरूकता आणि पर्यावरण संवर्धनाची भावना रुजवण्याचा उद्देश, 143 वर्षांची गौरवशाली परंपरा‎



शालेय विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, जैवविविधतेविषयी जागरूकता आणि पर्यावरण संवर्धनाची भावना रुजवण्याच्या उद्देशाने येथील निसर्ग संरक्षण संस्था (एनसीएसए) आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस.) यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी कार्यशाळा आ

.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही निसर्ग मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी शालेय शिक्षकांसाठी कार्यशाळा घेण्यात येते. या दोन दिवसीय कार्यशाळेचा पहिला दिवस अमरावती शहरात तर दुसरा दिवस धारणी तालुक्यातील मुठवा, वनसंवाद केंद्र येथे पार पडला. यात जिल्ह्यातील विविध शाळांमधील २६ शिक्षकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. सहभागी शिक्षकांना पहिल्या दिवशी शहरातील मेळघाट टायगर रिझर्व्ह व पर्यटन केंद्र (कॅम्प परिसर) अमरावती येथील कुलाधाप येथे प्रशिक्षण देण्यात आले, तर दुसऱ्या दिवशी मेळघाट येथील निसर्ग संरक्षण संस्थेच्या धारणी तालुका येथील मुठवा, वनसंवाद केंद्र, बोरी-कोठा येथे प्रशिक्षण पार पडले.

अमरावती येथील कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मणीबाई गुजराती हायस्कुलच्या प्राचार्य अंजली देव, निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेश एकघरे, रिसेटलमेंट ऑफिसर अतुल तीखे, वृंदा बापट, संजय विधळे उपस्थित होते. समारोप रेखा सुर्वे, शिक्षक प्रकाश लड्ढा, विशाल बनसोड यांच्या उपस्थितीत पार पडला. समन्वयक आरती वर्मा यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मेळघाट येथील कार्यशाळेला प्रमुख पाहुण्या म्हणून वनक्षेत्रपाल शुभांगी राउत यांची उपस्थिती होती.संस्थेचे संस्थापक प्रा. निशिकांत काळे यांनी वेळोवेळी कार्यक्रमाचे मार्गदर्शन केले व मूठबा ट्रेनिंग सेंटरच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी नंदकिशोर दुधे यांनी बीएनएचएस. निसर्ग मंडळ या उपक्रमाची रचना, शाळांमध्ये निसर्ग मंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया तसेच शालेय जैवविविधता नोंदवही याचे महत्त्व, त्याची आवश्यकता आणि नोंदवही तयार करण्याची पद्धत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रकल्प सहयोगी रोहन चव्हाण यांनी निसर्ग मंडळाचे वार्षिक उपक्रम स्पष्ट केले.

प्रा. निशिकांत काळे यांनी संस्थेचा इतिहास, विविध पर्यावरणविषयक उपक्रम आणि पर्यावरणीय समस्यांन विषयी सविस्तर माहिती दिली. कार्यशाळेदरम्यान शिक्षकांना पर्यावरण व निसर्ग संवर्धनाशी संबंधित विविध पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. तसेच शाळांच्या गरजेनुसार विज्ञान पेटीउपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन समन्वयक धनंजय सायारे यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *