Headlines

साताऱ्यात गणेश मिरवणुकीत फटाक्यांचा धडाका:ड्रॅगनच्या देखाव्याला आग, आयोजकावर गुन्हा दाखल




गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान निष्काळजीपणे फटाक्यांची आतषबाजी करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी आयोजकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नितीन प्रमोद भोसले (रा. शाहूपुरी, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या आयोजकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, दि. 8 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास राजवाडा बसस्थानक परिसरात गणेश मंडळाची मिरवणूक सुरू होती. यावेळी मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, याची जाणीव असतानाही फटाक्यांची निष्काळजीपणे आतषबाजी करण्यात आल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, फटाक्यांमुळे मिरवणुकीतील ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर उभारलेल्या कापडी-कागदी ड्रॅगनच्या प्रतिकृती असलेल्या देखाव्याला आग लागली. या आगीत ड्रॅगनची प्रतिकृती तसेच जनरेटर जळून नुकसान झाले. याप्रकरणी पोलीस हवालदार अमोल मानसिंग साळुंखे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून भारतीय न्याय संहितेतील कलम 287, 324(4) तसेच भारतीय दंड संहितेतील कलम 285, 427 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक न करता बीएनएसएस कलम 35(3) नुसार नोटीस देण्याची तजवीज करण्यात आली आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक कर्पे करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *