![]()
मराठा आरक्षणासाठी निर्णायक आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १८ वा दिवस आहे. आझाद मैदान पोलिसांनी आंदोलनासाठी दोन वेळा परवानगी नाकारूनही जरांगे पाटील आणि मराठा समाज आपल्या ‘मुंबई चलो’च्या भूमिकेवर ठाम आहे. आता मनोज जरांगे आणि काही वकिलांनी मिळून तिसऱ्यांदा पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज दाखल केला आहे. जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज मुंबई पोलिसांनी गणेशोत्सवाचे आणि कायदा सुव्यवस्थेचे कारण देत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला दोनदा परवानगी नाकारली आहे. आता मुंबईतील काही वकील बांधवांनी जरांगे आणि त्यांच्या ४ ते ५ सहकाऱ्यांना तरी आंदोलनाची परवानगी मिळावी, यासाठी आझाद मैदान पोलिसांकडे नव्याने तिसरा अर्ज दाखल केला आहे. यावेळेस तरी परवानगी मिळेल, अशी अपेक्षा मराठा आंदोलकांना आहे. परवानगी मिळो वा न मिळो, मुंबईकडे कूच करणारच आज दुपारी मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीतून मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत. “मी एकटाच मुंबईला जाणार, तुम्ही येऊ नका,” असे आवाहन जरांगे यांनी काल केले असले तरी, मराठा आंदोलक मात्र त्यांच्यासोबत जाण्यावर ठाम आहेत. उपचार पूर्णपणे थांबवले पोलिसांनी दुसऱ्यांदा परवानगी नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या जरांगे पाटील यांनी काल रात्रीपासून वैद्यकीय उपचार आणि सलाईन घेणे पूर्णपणे थांबवले आहे. आज सकाळी पुन्हा वैद्यकीय पथक त्यांची तपासणी करण्यासाठी आले होते, मात्र त्यांनी उपचारास स्पष्ट नकार दिला. यामुळे त्यांना मोठा अशक्तपणा जाणवण्याची शक्यता असल्याचे उपस्थितांचे म्हणणे आहे. आंदोलकांचा नवा पवित्रा – ‘आम्ही गणपती पाहायला जाणार!’ पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्याने मराठा आंदोलकांनी आता एक नवा आणि लक्षवेधी पवित्रा घेतला आहे. “आम्ही आमच्या सोयीनुसार मुंबईत गणपती पाहायला जाणार आहोत, आम्हाला गणेशोत्सव पाहण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जेव्हा जरांगे पाटील बोलावतील, तेव्हा आम्ही सर्वजण आझाद मैदानात जमा होऊ,” अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली आहे.
——————— ही बातमी पण वाचा.. जरांगेंच्या उपोषणाचा 17वा दिवस: मी मुंबईत एकटा येतोय, फडणवीस परवानगी देणार का? जरांगेंचा सवाल, म्हणाले- मराठा आंदोलकांना योग्यवेळी बोलावण्यात येईल मनोज जरांगे पाटील यांनी १५ सप्टेंबरला अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने रवाना होण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना सकाळी ११ वाजता मुंबईकडे निघणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधवांना सोबत न घेता आपण सुरुवातीला एकट्याने किंवा अत्यंत मोजक्या लोकांसह मुंबईकडे जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मुंबई पोलिसांनी त्यांच्या प्रस्तावित आंदोलनाला परवानगी नाकारली असतानाही १५ सप्टेंबरचा प्रवास नियोजित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सविस्तर वाचा
Source link
जरांगेंच्या उपोषणाचा 18वा दिवस, आज मुंबईकडे कूच:आझाद मैदानाच्या परवानगीचा तिढा कायम, तिसऱ्यांदा अर्ज; आंदोलक म्हणाले- आम्ही गणपती पाहायला जाणार