![]()
पांडे करमाळा तालुक्यात प्रथमच वराह जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकल हिंदू समाज करमाळाच्या वतीने रविवारी वराह जयंतीनिमित्त जिवंत वराहाची ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बँजोच्या तालावर जयघोष करत मिरवणूक काढण्यात आली. या अनोख्या उपक्रमामुळे वराह जयंतीची चर्चा परिसरात रंगली आहे. सकल हिंदू समाज करमाळाच्या वतीने वराह जयंतीनिमित्त मौलालीनगर येथून सायंकाळी ५ वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर मिरवणूक करमाळा शहरातील सुभाष चौक येथे पोहोचून सांगता करण्यात आली. मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखून शांततेत कार्यक्रम पार पडला. हिंदू धर्मातील धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णूंनी पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी वराह अवतार धारण केला. पुराणकथेनुसार, हिरण्याक्ष नावाच्या असुराने पृथ्वीला पाताळात नेले होते. त्यावेळी भगवान विष्णूंनी वराहाचे रूप धारण करून पृथ्वीचा उद्धार केला आणि तिचे रक्षण केले. त्यामुळे वराह अवतार हा पृथ्वीचे संरक्षण, संकटातून मुक्ती आणि धर्माच्या रक्षणाचे प्रतीक मानला जातो. यावेळी बँजोच्या तालावर नागरिकांनी जयघोष केला. मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांनी उत्साहात वराह जयंती साजरी केली. मौलालीनगर ते सुभाष चौक या मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. करमाळ्यात वराहाची मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी गुलालात माखलेले वराह.
Source link
बँजोच्या तालावर वराहाची ट्रॅक्टरमधून उत्साहात मिरवणूक:स्वयंभू गणेश मंदिरात भजन, पूजा, नामस्मरण