Headlines

खुलताबाद:मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा




मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून खुलताबाद शहर व तालुक्यात विविध सामाजिक संघटना आणि शिक्षण संस्थांच्या वतीने ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडला. जायंट्स ग्रुप ऑफ खुलताबादच्या वतीने आयोजित ध्वजारोहण सोहळा सामाजिक वनीकरण विभागाचे सेवानिवृत्त लेखापाल तथा जायंट्स ग्रुपचे संचालक गोरखनाथ बारगळ यांच्या हस्ते संपन्न झाला. या वेळी जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष सतीश कोळी, उपनगराध्यक्ष नवनाथ बारगळ, पंचायत समिती सदस्य दिनेश अंभोरे, नगरसेवक परसराम बारगळ, फेडरेशन ऑफिसर दिनेश सावजी, सुनील मरकड, माजी अध्यक्ष संदेश केरे, यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करत सामाजिक दायित्व जपण्याचा निर्धार व्यक्त केला. खुलताबाद शहरातील मराठी माध्यमिक विद्यालय आणि यशोदीप विद्या मंदिर येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक परसराम बारगळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य दिनेश अंभोरे, संस्थेच्या अध्यक्षा डॉ. लक्ष्मी भारती, माजी नगरसेवक फकिरचंद काळे, संतोष बारगळ, त्रिंबक साबळे, मुख्याध्यापक संजय ठुबे व राहुल चाटसे यांच्यासह शिक्षकवृंद, स्थानिक नेते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *