Headlines

साखर टंचाईमुळे गळीत हंगाम महिनाभर आधीच सुरू करणार:छत्रपती संभाजीनगर विभागातील 6 कारखान्यांचा गळीत हंगाम यावर्षी 15 क्टोबरपूर्वी सुरू करण्याच्या हालचाली



देशातील साखरेची उपलब्धता आणि वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा साखर गाळप हंगाम महिनाभर आधी सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील संभाजीनगर, जालना, बीड, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांतील ४३ कारखान्यांपैकी ६ कारखाने १५

.

गाळप हंगामाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय साखर आयुक्त कार्यालयात बैठक झाली. प्रादेशिक सहसंचालक (साखर) विशाल जाधवर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला कृषी अधिकारी एस. एस. जेधे यांच्यासह साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत कारखान्यांची यंत्रसामग्री व गाळपाची तयारी, कामगारांचे आरोग्य व सुरक्षा, कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था, जनावरांचे आरोग्य व सुरक्षा, शेतकऱ्यांना मिळणारा ऊसदर आणि ऊस वाहतुकीची व्यवस्था यांचा आढावा घेण्यात आला. आरोग्य, पोलिस, शिक्षण आणि परिवहन विभागालाही आवश्यक सूचना देण्यात आल्या.

दृष्टिक्षेपात कारखाने २७ सहकारी कारखाने १२ खासगी कारखाने ४ खांडसरी उत्पादक कारखाने १० सहकारी कारखाने बंद

ऊस तोडणीत अडचणी नाहीत

भर पावसाळ्यात उसाची तोडणी कशी करावी, असा प्रश्न होता. मात्र, यंदा पाऊस नसल्यामुळे शेतात ऊस तोडणीसाठी अडचणी येणार नाहीत. त्याचबरोबर उसाची वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर आदी वाहनेही शेतापर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे पावसाळ्यात उसाचे गाळप सुरू करणे शक्य होणार आहे.

केंद्र सरकारच्या सूचना

केंद्र सरकारने देशातील साखरेच्या वाढत्या किमती आणि बाजारातील संभाव्य टंचाईचा धोका लक्षात घेऊन साखर कारखाने लवकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार राज्यात १५ ऑक्टोबरपासून गाळप सुरू करण्याचे नियोजन आहे. एरवी नोव्हेंबरमध्ये सुरू होणारा गाळप हंगाम यंदा महिनाभर आधी सुरू होणार आहे.

पूर्वतयारीचा आढावा घेतला

१५ ऑक्टोबरपूर्वी किमान ६ कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न आहे. कारखान्यांच्या पूर्वतयारीचा आढावा घेऊन संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. – विशाल जाधवर, प्रादेशिक सहसंचालक (साखर), छत्रपती संभाजीनगर विभाग

संकटात असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा

मराठवाड्यात पाण्याची उपलब्धता कमी असल्याने उसाचे पीकही अडचणीत आहे. शेतकऱ्यांना उसाला पाणी देण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने शेतातील ऊस अधिक काळ उभा ठेवण्याऐवजी वेळेत गाळपासाठी आणणे आवश्यक ठरणार आहे. उसाचे पीक जगवण्यासाठी कसरत करणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता गाळप लवकर सुरू झाल्यास सुटणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *