Headlines

MPSC विद्यार्थ्यांचे पुण्यात 2 ऑक्टोबरपासून बेमुदत आंदोलन:विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासह इतर मागण्यांसाठी रोहित पवार, विश्वजीत कदम सहभागी




महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांचे २ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून एस. एम. जोशी पूल, नवी पेठ, पुणे येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू होणार आहे. आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे. आमदार रोहित पवार आणि डॉ. विश्वजीत कदम यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांनी भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचा कार्यकाळ नुकताच सुरू झाल्याचे म्हटले होते. मात्र, भीमनवार यांच्या कार्यकाळात काही पेपरफुटीची प्रकरणे समोर आल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. अध्यक्षांच्या राजीनाम्याशिवाय माघार न घेण्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. पोलिसांनी २७ सप्टेंबरच्या आंदोलनाला तांत्रिक कारणांमुळे परवानगी नाकारली होती. पण, २ ऑक्टोबर (गांधी जयंती) रोजी आंदोलनास परवानगी देण्यास सहमती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत येत्या दोन दिवसांत एमपीएससी विद्यार्थी आंदोलकांची एक बैठक होणार आहे. आमदार रोहित पवार यांनी हे आंदोलन पूर्णतः अराजकीय आणि विद्यार्थी हिताचे असल्याचे म्हटले. काँग्रेस नेते डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाचाही या आंदोलनाला पाठिंबा आहे. गरज पडल्यास राहुल गांधी देखील आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी पुण्यात उपस्थित राहू शकतात, असे कदम म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *