![]()
शेतमालाला योग्य भाव मिळवून देणे, शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये पारदर्शकता ठेवणे आणि आवारात विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे हेच बाजार समितीचे मुख्य उद्दिष्ट असून, समितीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या हिताला सदैव प्राधान्य दिले जाईल, असे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास देवरे यांनी केले. आगामी काळातही सर्व संचालक मंडळ व सदस्यांना सोबत घेऊन बाजार समितीचा नावलौकिक वाढवण्यासाठी निरंतर प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. येथील स्व. निवृत्तीकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी देवरे बोलत होते. सभेची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली. या वेळी उपसभापती दादाजी खैरनार, माजी सभापती प्रशांत देवरे, माजी सभापती देवानंद वाघ, माजी उपसभापती सतीश ठाकरे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदेश बाफना व उपाध्यक्ष मुन्ना आहेर यांनी मनोगत व्यक्त केले. सचिव तुषार गायकवाड यांनी सभेपुढील विषयपत्रिका वाचून दाखवली, ज्याला सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात एकमुखाने मंजुरी दिली. उपस्थितांचे आभार माणून सभेची सांगता झाली. या प्रसंगी परिसरातील शेतकरी, व्यापारी, हमाल-मापारी बांधव, कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य, कर्मचारी वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
शेतमालाला योग्य भाव हेच उद्दिष्ट:उमराणे बाजार समितीत सभापती देवरे यांचे प्रतिपादन