![]()
सुरेल भाव, भक्तिगीते अन् अविट गोडीच्या सुरांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. मर्मबंधातील ठेव गाण्याच्या सुरावर भावगीते, भक्तिगीते आणि चित्रपट गीतांच्या सुरावर रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. गणरायाच्या आराधनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. “मर्मबंधातील ठेव”
.
प्रारंभी श्री स्वामी समर्थ व श्री गणेश प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन उद्योगपती सुनील गोरे, डॉ. विपुल शहा, हर्षवर्धन एखंडे, रामचंद्र आलुरे, बसवराज वेळापूरकर, यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कलावंत प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशपायन, रूपक वझे, मिलिंद लिंगायत, शिवाजी सुतार, विक्रम परिट, स्वप्नील रास्ते, अभिषेक कुलकर्णी यांचा सत्कार शिवशरण जोजन, रुपाली येणेगुरे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. दि. २९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरपर्यंत दररोज संध्याकाळी साडेसहा वाजता प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन, अक्कलकोट येथे व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. यावेळी दत्तकुमार साखरे, विलास कोरे, दयानंद बिडवे, प्रशांत शिंपी, महेश कलशेट्टी, प्राचार्य मलकप्पा भरमशेट्टी आदींसह नागरिक उपस्थित होते. प्रतिष्ठानचे संयोजक जेष्ठ नेते मल्लिनाथ कल्याणशेट्टी, सिद्धेश्वर कल्याणशेट्टी, शांभवीताई कल्याणशेट्टी, पुष्पा घाटगे, अशोक येणगुरे, मनोज कल्याणशेट्टी आदींसह पदाधिकारी प्रयत्नशील होते. सूत्रसंचालन खंडेराव घाटगे यांनी केले.
अक्कलकोट । येथील स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने २९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरपर्यंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आहे. त्याचे पहिले पुष्प अभिनेते सागर कारंडे यांचे “शिक्कामोर्तब” या तुफान विनोदी नाटकाने झाले. प्रारंभी श्री स्वामी समर्थ व श्री गणेश प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन श्री वटवृक्ष देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे व माजी सभापती प्रभाकर मजगे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कलावंत कांचन पगारे यांचा सत्कार बाळा शिंदे, स्नेहा पराडकर यांचा सत्कार पूजा कल्याणशेट्टी, कृत्तिका तुळसकर यांचा सत्कार श्रिया कल्याणशेट्टी, सागर कारंडे यांचा सत्कार मल्लिकार्जुन अळगी, स्वप्नील रास्ते यांचा सत्कार गुरुपादप्पा आलगी यांच्या हस्ते करण्यात आले. स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबविले जातात. २९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर पर्यंत दररोज संध्याकाळी साडेसहा वाजता प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन,अक्कलकोट येथे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
अक्कलकोटमध्ये आज गुंजन पाटील यांच्या लोकप्रिय कवितांची मैफल रंगणार