![]()
अमरावतीमध्ये एका फार्मसी विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गातील विद्यार्थ्याने चाकूने हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यातून ती थोडक्यात बचावली. या घटनेच्या निषेधार्थ अमरावती जिल्हा तैलिक समिती आणि महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली. आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले. या घटनेमुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे विभागीय अध्यक्ष संजय हिंगासपुरे, विभागीय सचिव राजेंद्र हजारे, अमरावती जिल्हा सहसचिव बबनराव भेरडे आणि सकल तेली समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
अमरावतीत कॉलेज विद्यार्थिनीवर चाकू हल्ला:आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल करून कठोर कारवाईची तैलिक समितीची मागणी