Headlines

कोरकू भाषिक आशा सेविकांच्या नियुक्तीसाठी मेळघाटातील आदिवासींचा ठिय्या:सीईओंनी जमिनीवर बसून मागणी मान्य केली; गाडसिंबावासियांनी पुढाकार घेतला




मेळघाटातील शेकडो आदिवासी महिला व तरुणांनी कोरकू आशा सेविका नियुक्तीसाठी अमरावती जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन केले. भाषेच्या अडचणीमुळे स्थानिक महिलांना प्राधान्य देण्याची मागणी होती. दयाराम बेलसरे आणि अनिकेत मावस्कर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. डॉ. प्रवीण पारिसे यांच्या कार्यालयासमोर आंदोलन झाले. समाधान न झाल्याने आंदोलकांनी सीईओ सत्यम गांधी यांच्या कक्षासमोर ठिय्या दिला. तीन तास चाललेल्या आंदोलनानंतर सीईओंनी जमिनीवर बसून संवाद साधला. त्यांनी मागण्या मान्य करत स्थानिक कोरकू भाषिक महिलांना आशा सेविका म्हणून प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. सीईओंनी शासनाकडून मार्गदर्शन मिळेपर्यंत आधीच्या नियुक्त्या थांबवण्याचे आदेश दिले. उच्च शिक्षित की स्थानिक भाषा येणाऱ्यांना प्राधान्य द्यावे, याबाबत शासनाकडे विचारणा केली जाईल. या आश्वासनानंतर आदिवासींनी आंदोलन मागे घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *