![]()
राज्यातील दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या 265 तालुक्यांतील शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. खरीप 2026 हंगामात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदतीच्या कर्जात पुनर्गठन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीलाही स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली. दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जफेडीसाठी अतिरिक्त वेळ मिळावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. मदत व पुनर्वसन विभागाने दुष्काळी परिस्थिती घोषित केलेल्या तालुक्यांसाठी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार सहकार विभागाने पीक कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याबाबत निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या संमतीने होणार कर्जाचे पुनर्गठन खरीप हंगामात शेतकऱ्यांनी घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड करण्याची मुदत 31 मार्चपर्यंत असते. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे निर्धारित वेळेत कर्जाची परतफेड करणे शक्य न झालेल्या शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. संबंधित शेतकऱ्यांची संमती घेऊन त्यांच्या अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदतीच्या कर्जात पुनर्गठन करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना कर्जफेडीसाठी अधिक कालावधी मिळेल. सर्व बँकांनी कर्ज पुनर्गठनाची प्रक्रिया 30 एप्रिल 2027 पर्यंत पूर्ण करावी, असे शासन परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, संबंधित शेतकऱ्यांना पुढील खरीप हंगामासाठीही पीक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत. बँकांना शासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे निर्देश या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था तसेच राज्यस्तरीय बँकर्स समितीचे समन्वयक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांना या सवलतींचा लाभ निर्धारित कालमर्यादेत मिळावा, यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. कोणत्या जिल्ह्यांतील तालुक्यांना मिळणार लाभ? राज्यातील 6 महसूल विभागांमधील 265 तालुक्यांचा या निर्णयात समावेश आहे. यामध्ये कोकण, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागांतील विविध तालुक्यांचा समावेश आहे. कोकण विभाग : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन; रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड आणि वेंगुर्ला. नाशिक विभाग : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला आणि देवळा. धुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर आणि यावल. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा आणि अक्राणी. अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर आणि राहता. पुणे विभाग : पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस आणि मंगळवेढा. सांगली जिल्ह्यातील मिरज, आटपाडी, जत आणि कवठेमहाकाळ. सातारा जिल्ह्यातील सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा आणि महाबळेश्वर. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा आणि चंदगड. छत्रपती संभाजीनगर विभाग : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड आणि फुलंब्री. जालना जिल्ह्यातील बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन आणि जाफ्राबाद. बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर आणि वडवणी. लातूर जिल्ह्यातील लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी आणि जळकोट. धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा आणि उमरगा. नांदेड जिल्ह्यातील नांदेड, बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर आणि नायगाव. परभणी जिल्ह्यातील पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत आणि पाथरी. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव आणि वसमत. अमरावती विभाग : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली, देऊळगावराजा, मेहकर, बुलढाणा, सिंदखेडराजा, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा आणि नांदुरा. अमरावती जिल्ह्यातील अमरावती, भातुकली, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगावसुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरूड, मोर्शी, चांदूरबाजार आणि दर्यापूर. अकोला जिल्ह्यातील अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मुर्तीजापूर, बाळापूर आणि बार्शीटाकळी. वाशिम जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगळूरपीर, कारंजा आणि मानोरा. यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस, आर्णी, नेर, पुसद, उमरखेड, महागाव, वणी, मारेगाव, झरी-जामणी, केळापूर, घाटंजी आणि राळेगाव. नागपूर विभाग : वर्धा जिल्ह्यातील वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट आणि आष्टी. नागपूर जिल्ह्यातील नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड आणि नागपूर शहर. भंडारा जिल्ह्यातील भंडारा, पवनी आणि लाखांदूर. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा. चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभीड, सिंदेवाही आणि पोंभुर्णा. गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली आणि चामोर्शी. या निर्णयामुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना कर्जफेडीसाठी अतिरिक्त मुदत मिळणार असून, पुढील खरीप हंगामासाठी पीक कर्ज मिळण्याचाही मार्ग मोकळा होणार आहे. हेही वाचा… दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना:सहलीसाठी आलेल्या 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, पोलिसांनी सर्व मृतदेह बाहेर काढले कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी गुरुवारी (1 ऑक्टोबर) मोठी दुर्घटना घडली. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून सहलीसाठी आलेल्या 8 विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे दिवेआगर परिसरात मोठी खळबळ उडाली असून समुद्रकिनारी शोककळा पसरली आहे. सविस्तर वाचा…
Source link
दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा:पीक कर्जाचे पुनर्गठन, वसुलीलाही स्थगिती