![]()
विलास घुले हत्या प्रकरणात मला आणि माझ्या मुलाला (सौरव सोनवणे) अडकवण्यासाठी वाल्मीक कराड याने बीड कारागृहातूनच कट रचला, असा गंभीर आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी केला. गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी वाल्मीक कराडच्या संवादाची ऑडिओ क्लिप ऐकवली. यात तो समोरील व्यक्तीला मृतदेह पोलिस ठाण्यासमोर ठेवा, पाण्याच्या टाकीवर चढा मात्र खासदाराच्या मुलावर गुन्हा नोंदवा असे सांगत असल्याचा उल्लेख आहे. ‘दिव्य मराठी’ या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. सुग्रीव गोरेला केला फोन सोनवणे म्हणाले, आरोपानंतर एसआयटी, सीआयडीने संपूर्ण चौकशी केली. अगोदर माझे नाव येतेय, असे सांगितले. त्यानंतर माझ्या मुलाचे नाव येतेय, म्हणून सांगितले. मुलाचे नाव घेण्यासाठी कट रचला, मृतदेह पोलिस ठाण्यात ठेवण्यात आला. त्यानंतर हाऊसमध्ये आमदार बोलले. वाल्मीक याने कारागृहातून सुग्रीव कराडला फोन करून “खासदार बजरंग सोनवणे यांच्या पोराला विलास घुले खून प्रकरणात अडकवा, असे म्हटल्याचे यावेळी सोनवणे यांनी सांगितले.
Source link
घुले हत्या प्रकरण:मला, मुलाला अडकवण्याचा कट- सोनवणे, वाल्मीकच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप ऐकवली