![]()
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कापूस खरेदी केंद्राचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे (छ. संभाजीनगर) सभापती श्रीराम शेळके यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी ७ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असू
.
केंद्राचे संचालक व माजी सरपंच सुदाम हरिश्चंद्र पवार यांनी सांगितले की, यंदा परिसरात दुष्काळी परिस्थिती आहे. अशा कठीण काळात शेतात काम करताना शेतकऱ्यांना पिण्यासाठी थंड पाणी मिळावे, या हेतूने केंद्र सुरू करताना प्रत्येक शेतकऱ्याचा सन्मान म्हणून ५ लिटर क्षमतेचे १०१ पाण्याचे जार भेट देण्यात आले आहेत.
या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीराम शेळके, संचालक सुदाम ठोंबरे, वीर वड्डार एकता फाउंडेशनचे अध्यक्ष विजय गोरे, भाजप जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पडुळ, सोसायटी चेअरमन विजय काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश शिंदे, निमंत्रक सुदाम पवार, तंटामुक्त अध्यक्ष आनंदा पवार, अनिल शेजूळ, बाबासाहेब चौधरी, सुरेश शिंदे, सोमनाथ घायट, ऋषी नरवडे, प्रवीण पडुळ यांच्यासह परिसरातील नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांसाठी नाष्ट्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.