Headlines

लिहाखेडी येथील आरोग्य उपकेंद्रच अंधारात:प्रसूतीसाठी सिल्लोडला धाव, तीन वर्षांपासून वीज गुल, उपकेंद्रातील कर्मचारीही सुविधांच्या प्रतीक्षेत‎



शासनाने लाखो रुपये खर्चून उभारलेली आरोग्य यंत्रणा प्रशासकीय अनास्थेमुळे कशी धूळ खात पडते, याचा जिवंत पुरावा सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी येथील आरोग्य उपकेंद्राच्या रूपाने समोर आला आहे. वीजबिलाच्या थकबाकीमुळे महावितरणने सुमारे तीन वर्षांपूर्वी या उपके

.

‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने रात्री १० च्या सुमारास उपकेंद्राला थेट भेट देऊन पाहणी केली असता संपूर्ण आवारात काळोख पसरल्याचे दिसून आले. उपकेंद्राला संरक्षक गेट नाही. वीज नाही. पाण्याचीही सुविधा नाही. त्यामुळे येथे रात्रीच्या वेळी एकही आरोग्य कर्मचारी वास्तव्यास नसतो. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार कर्मचारी केवळ सकाळी ते संध्याकाळपर्यंत उपस्थित असतात. रात्री अचानक एखादा रुग्ण आला, किंवा महिलेची प्रसूती असली, तर प्रकाशाअभावी प्राथमिक उपचारही शक्य होत नाहीत. अशा वेळी रुग्णांना थेट पालोद किंवा सिल्लोड येथे धाव घ्यावी लागते. या उपकेंद्राला गेट नाही. तीन वर्षांपासून वीज नाही. याबाबत अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र कार्यवाही झाली नाही. रात्री प्रसूतीसाठी महिलांना पालोद किंवा सिल्लोडला न्यावे लागते. प्रशासनाने तातडीने वीज आणि गेटची व्यवस्था करावी, अशी मागणी लिहाखेडी येथील ग्रामस्थ समाधान वराडे यांनी केली आहे. तीन वर्षांपूर्वी मीटर काढून नेण्यात आला. मात्र त्यानंतर नवीन मीटर बसवला नाही. गेटची मागणी करूनही त्याची व्यवस्था झाली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत की संबंधित आरोग्य विभाग, या परिस्थितीला जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. प्रशासनाने तातडीने पाहणी करून वीज, गेट, आणि पाणी यांची व्यवस्था करून उपकेंद्र सुसज्ज करावे, अशी मागणी होत आहे. उपकेंद्राच्या इमारतीची अवस्था बिकट असून कर्मचाऱ्यांनीही वीज आणि गेट संदर्भात ग्रामपंचायतीकडे वारंवार दाद मागितली आहे. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे कर्मचाऱ्यांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मूलभूत सुविधाच नसल्याने कर्मचाऱ्यांना रात्री येथे थांबणे अशक्य झाले आहे. या परिस्थितीत नियमित वीजपुरवठा पूर्ववत सुरू करून नवीन मीटर बसवावे, तसेच कायमस्वरूपी तोडगा म्हणून उपकेंद्रावर सौरऊर्जा यंत्रणा बसवावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

दोन दिवसांत वीज-पाणी देणार Ãया विषयाबाबत संबंधित विभागाकडून अद्याप माझ्यापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती किंवा अपडेट प्राप्त झालेली नाही. तरीसुद्धा, नागरिकांची व उपकेंद्राची अडचण विचारात घेऊन, पुढील दोन दिवसांत वीज आणि पाणीपुरवठ्याची योग्य व्यवस्था पूर्ण करून दिली जाईल – दिनेश राठोड , ग्रामसेवक, लिहाखेडी

सौरऊर्जा व गेटसाठी पाठपुरावा करणार Ãमी स्वतःलिहाखेडी येथील आरोग्य उपकेंद्राची पाहणी केली असून सौरऊर्जा यंत्रणा तसेच गेटच्या कामाची आवश्यकता लक्षात आली आहे. या दोन्ही कामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा करून पाठपुरावा करणार आहे. पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद स्तरावरील योग्य योजनेतून ही कामे लवकरात लवकर करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. आरोग्य उपकेंद्रात रुग्णांना रात्रीच्या वेळीही सुरक्षित आणि योग्य सुविधा मिळणे आवश्यक आहे. – सचिन वाघ , जिल्हा परिषद सदस्य



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *