Headlines

MNS-Shiv Sena Mumbai Morcha Route Change; Metro Cinema To BMC Headquarters


केंद्रीय निवडणूक आयोगाचा कारभार आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधूंच्या (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) नेतृत्वाखाली येत्या 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत निघणाऱ्या महामोर्चाच्या मार्गात ऐनवेळी महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. भायखळ

.

पोलिसांच्या सूचनेचा मान; वेळेत आणि सभेत कोणताही बदल नाही

मोर्चाच्या नियोजनातील बदलाबाबत माहिती देताना ॲड. अनिल परब म्हणाले, “भायखळ्याच्या मूळ मार्गावर रस्त्याच्या मधोमध साडेतीन ते चार फुटांचे उंच दुभाजक उभारण्यात आले आहेत. मोर्चात लाखो कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होणार असल्याने काही अनपेक्षित घटना किंवा चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती उद्भवल्यास लोकांना बाहेर पडण्यासाठी सुरक्षित मार्ग उरणार नाही, अशी भीती मुंबई पोलीस आयुक्तांच्या शिष्टमंडळाने व्यक्त केली होती.”

उद्धव आणि राज ठाकरेंची सहमती

परब म्हणाले, “पोलीस प्रशासनाची ही विनंती आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कानावर घातली. जनसुरक्षा सर्वात महत्त्वाची असल्याने दोन्ही नेत्यांनी चर्चा करून मोर्चाचा मार्ग बदलण्यास तत्काळ संमती दिली.पूर्वी ज्याप्रमाणे ऐतिहासिक ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात आला होता, त्याच धर्तीवर आता ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक १० वाजता मेट्रो सिनेमा येथून मोर्चाला सुरुवात होईल. तिथून हा मोर्चा मुंबई महानगरपालिका मुख्यालयाजवळ मुंबई मराठी पत्रकार संघाच्या समोरील प्रांगणात पोहोचेल. तिथेच भव्य व्यासपीठावरून नेत्यांची सभा होईल. मोर्चाची वेळ आणि सभेचे ठिकाण पूर्वीप्रमाणेच कायम असून केवळ मार्ग बदलला आहे.”

आम्ही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतो, पण उत्तरं भाजप का देते?

विरोधकांच्या एकजुटीवर सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या टीकेला ॲड. अनिल परब यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिले. “काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या मोर्चाला सक्रिय पाठिंबा दिला आहे. मात्र, आमचे अस्तित्व संपल्याची टीका भाजप करत आहे. आमचा मूळ प्रश्न हा आहे की, आम्ही जाब घटनात्मक संस्था असलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाला विचारत आहोत, मग त्याचे उत्तर भाजपचे नेते का देत आहेत? निवडणूक आयोग आणि भाजपमध्ये इतके घनिष्ठ संबंध का आहेत?” “या सरकारची कातडी गेंड्यासारखी जाड झाली आहे. मात्र, लोकशाहीच्या संरक्षणासाठी आंदोलनाचा हा त्रिशूळ जोपर्यंत आत घुसत नाही, तोपर्यंत जनआक्रोश शांत होणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.

4 ऑक्टोबरला ठिणगी पडेल, त्याचा वणवा देशभर पसरेल – बाळा नांदगावकर

पत्रकार परिषदेत बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. “4 ऑक्टोबरला मुंबईतून आम्ही जी आंदोलनाची ठिणगी टाकणार आहोत, त्याची गर्जना संपूर्ण देशात ऐकू जाईल. या ठिणगीचा देशभरात वणवा पेटेल आणि देशातील लोकशाहीशी खेळणाऱ्या ज्ञानेश कुमारांना पदाचा राजीनामा देऊन घरी जावेच लागेल.”

“गेल्या 25 ते 28 दिवसांपासून मतदार यादीतील फेरफार आणि मनमानी कारभाराविरोधात सातत्याने आवाज उठवला जात आहे. मतदारांची मते पद्धतशीरपणे चोरूनच हे सत्तेवर आले आहेत, अशी भावना आता जनमानसात घट्ट झाली आहे. त्यामुळे 4 तारखेला सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरून या व्यवस्थेचा सोक्षमोक्ष लावेल.”

स्थानिक विरोधावर भाष्य

दादर व शिवाजी पार्क परिसरातील आंदोलनांना स्थानिक नागरिकांचा विरोध असल्याच्या मुद्द्यावर नांदगावकर म्हणाले की, “मुंबई पोलीस अत्यंत सक्षम असून परिस्थिती हाताळण्यास समर्थ आहेत. काही मूठभर लोक राजकीय हेतूने प्रेरित होऊन आंदोलनाला विरोध करत आहेत.”

दरम्यान, दोन्ही ठाकरे बंधू स्वतः सर्व समविचारी पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधत असून, महाविकास आघाडीसह विविध सामाजिक संघटना आणि नागरिक या महामोर्चामध्ये पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून देशाचे संविधान वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

——————————————

हेही वाचा…

सत्तेला ‘नाही’ म्हणण्याची ताकद हीच गांधीजींची खरी देणगी:सत्ताधाऱ्यांना गांधीजी फक्त श्रद्धांजली पुरते हवे आहेत- राज ठाकरे

सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात गांधीजींची आठवण खरंतर अधिक प्रकर्षाने यायला हवी. कारण त्यांनी सत्तेला प्रश्न विचारायला शिकवलं… आणि प्रश्न विचारणं हे सद्य सत्ताधाऱ्यांना आवडत नाही. प्रश्न विचारले की, ते आणि त्यांच्या समर्थकांच्या ‘ ट्रोळ्या ‘ तुम्हाला देशद्रोही ठरवायला आतुरच असतात, अशी पोस्ट महात्मा गांधीजींच्या जयंतीचे औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.