Headlines

बायकोची पोत गहाण ठेवूनही कर्ज संपेना:बुलढाण्यात हताश शेतकऱ्याने घेतला फास, चिठ्ठीत मांडली दुष्काळाची भीषणता; महसूलमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी घटना


“वावर विकून कर्ज फिटले नाही, बायकोची पोत गहाण ठेवूनही पाहिजे तितके पैसे भेटले नाहीत…” अशी हृदयद्रावक चिठ्ठी लिहून चोंडी टाकळेश्वर (ता. संग्रामपूर) येथील अल्पभूधारक शेतकरी शंकर रामभाऊ भारसाकळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी, ३ ऑक्टोबर रोजी

.

यंदा पडलेला दुष्काळ, पिकांचे झालेले नुकसान आणि वाढत्या कर्जामुळे शंकर भारसाकळे मानसिक तणावात होते. डोक्यावरचा कर्जाचा डोंगर उपसण्यासाठी त्यांनी आधी जमिनीचा तुकडा विकला, त्यानंतर उरलेली जमीन आणि संसारातील शेवटचा आधार असलेले पत्नीचे मंगळसूत्र (पोत) गहाण ठेवले. या सर्व प्रयत्नांनंतरही कर्जाचा विळखा न सुटल्याने त्यांनी नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलले.

नापिकी, कर्जाचे वेदनादायी वास्तव

जीवन संपवण्यापूर्वी शंकर भारसाकळे यांनी लिहिलेली भावुक चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. त्यात त्यांनी नापिकी आणि कर्जाचे वेदनादायी वास्तव मांडले आहे. महसूलमंत्री बावनकुळे ३ ऑक्टोबर रोजी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी येत असतानाच ही घटना घडली. त्यामुळे सरकारी मदतीची प्रक्रिया केवळ दौऱ्यांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष बांधावर पोहोचावी, अशी संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *