Headlines

जिल्ह्यात जिल्हाधिकारी गौैडा यांचा दुष्काळ पाहणी दौरा:काँग्रेसचे बोरसे यांनी केली सरसकट मदतीची मागणी‎




छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, खुलताबाद, फुलंब्री या तालुक्यांमधील माळीवाडा, सराई, चौका, वारेगाव परिसराचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पिण्याच्या पाण्याचे साठे, जनावरांचा चारा, टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि रोजगाराच्या उपलब्धतेची पाहणी केली. तसेच पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा तातडीने थांबवून पाण्याचे स्रोत संरक्षित करण्याचे सक्त आदेश संबंधित यंत्रणेला दिले. या पाहणी दरम्यान फुलंब्री तालुक्यातील वारेगाव येथे काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप बोरसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दीले. फुलंब्री तालुक्यात यंदाच्या हंगामात सोयाबीन, मका, कापूस, ज्वारी आणि अद्रकसह सर्व खरीप पिके शंभर टक्के करपून वाया गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तालुक्यात तातडीने सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून नवीन पीक कर्ज पुरवठा शतप्रतिशत उपलब्ध करून द्यावा आणि जनावरांच्या सुरक्षेसाठी तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी ठाम मागणी संदीप बोरसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दुष्काळग्रस्तांच्या समस्या गांभीर्याने ऐकुण घेत योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *