Headlines

केतन अग्रवाल ख:सियाचा पहिल्यांदा सापाचा बहाणा, दुसऱ्यांदा 400 फूट दरीत ढकलले, मैत्रिणींच्या जबाबातून मिळाले आता वेगळे वळण




लोहगडच्या ४०० फूट खोल दरीत पडून केतन अग्रवालचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता रोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिने पोलिसांना आणि तिच्या मैत्रिणींना सांगितलेल्या वेगवेगळ्या कहाण्यांमुळे ती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. घटना घडली त्यावेळी एक कहाणी, त्याच दिवशी मैत्रिणींसमोर दुसरी आणि त्यानंतर विचारणा झाल्यावर तिसरीच कहाणी तिने रचल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. सियाच्या मैत्रिणींच्या पोलिस जबाबांतून चेतन चौधरीसोबतचे तिचे कथित संबंध, लग्नाला असलेला विरोध, लोहगडवरील आधीच्या हालचाली आणि घटनेनंतरचा “भाई, काम कर दिया’ हा संवाद, अशा कटाच्या अनेक साखळ्या आता जोडल्या जात आहेत. २० लाखांचा टिळा आणि चेतनसोबतचे संबंध सियाच्या नेल आर्टिस्ट मैत्रिणीने दिलेल्या जबाबातून वेगळी माहिती समोर आली आहे. सियाने तिला सांगितले होते की, “मला केतनसोबत लग्न करायचे नाही. मी चेतनसोबत रिलेशनशिपमध्ये असून त्याच्याशीच लग्न करणार आहे.’ मग केतनसोबत साखरपुडा का केला? यावर सिया म्हणाली, “आई-वडिलांनी टिळ्याच्या कार्यक्रमावर २० लाख रुपये खर्च केले आहेत. आता लग्नाला नकार दिल्यास समाजात बदनामी होईल. यातूनच तिला केतनला मार्गातून हटवायचे होते. विशेष म्हणजे, १४ जून रोजीही केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न सियाने केला होता, मात्र तो वाचला आणि स्वतःवरील संशय टाळण्यासाठी तिने तिथे साप आल्याचे नाटक केले होते. तीन वेगवेगळे घटनाक्रम लोहगडवर: १८ जून रोजी केतन दरीत पडल्यानंतर सियाने आरडाओरड केली. तेव्हा तिने उपस्थितांना सांगितले की, केतन मोबाइलमध्ये किल्ल्यावरून दरीचा फोटो काढत असताना पाय घसरून पडला. मैत्रिणींसमोर: याच घटनेबाबत त्याच दिवशी पुण्यातील मार्केटयार्ड येथील घरी मैत्रिणींनी विचारले असता, सियाने सुरुवातीला “मस्ती मस्ती में हो गया, मी मागे वळून पाहिले तेव्हा केतन खाली पडला होता,’ असे सांगितले. पाणी देताना: मैत्रिणींनी अधिक खोदून विचारल्यावर, “मी बसले होते, त्याला पाणी देत असताना तो पडला,” असा दावा तिने केला. पाणी देताना व्यक्ती दरीत कशी पडू शकते? या प्रश्नावर तिने पुन्हा कहाणी बदलली आणि ‘तो दरी पाहण्यासाठी पुढे गेला असता उजवा पाय घसरून पडला,’असे सांगितले. २९ एप्रिलपासूनच रचला होता कट हा अपघात नसून पूर्वनियोजित कट असल्याचे पुराव्यांवरून दिसत आहे. रितेशने हडपसर येथील एका मैत्रिणीला सांगितले होते की, चेतन आणि सिया २९ एप्रिल रोजी लोणावळ्याला जाऊन आले होते. तिथेच ‘कुठे व कसे काय करायचे’ याची संपूर्ण योजना त्यांनी आखली होती. चेतन चौधरी रितेश हंगे याला म्हणाला, ‘भाई, काम कर दिया…’ प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा धागा रितेश हंगे याच्याशी जोडला गेला आहे. घटनेच्या रात्री मुख्य संशयित चेतनने रितेशला फोन करून ‘भाई, काम कर दिया’ असे सांगितले. त्यानंतर कात्रजमधील इंजिनियर्स कॅफेत भेटून चेतनने आपण आणि सियाने मिळून केतनला ढकलल्याची कबुली दिली. चेतन लोहगडला जाताना ओळख लपवण्यासाठी हुडी घालून गेला होता, तसेच लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून त्याने स्वतःचा मोबाइल न वापरता दुकानातील कामगाराचा मोबाइल सोबत नेल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *