Headlines

सॉफ्टवेअर हॅक करूनपळवली स्कॉर्पिओ कार:सीसीटीव्ही फुटेजमुळे चोरी उघड, गुन्हा दाखल




छत्रपती संभाजीनगर | हायटेक चोरट्यांच्या एका टोळीने सातारा गावातून अवघ्या ८ मिनिटांत काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी लंपास केली. शुक्रवारी (२ ऑक्टोबर) पहाटे ४:१६ वाजेच्या सुमारास घडलेली ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सातारा येथील रहिवासी आकाश प्रकाश चव्हाण (३०) यांनी आपली स्कॉर्पिओ (एमएच २० एफयू ९१९९) घरासमोर उभी केली होती. पहाटे क्रेटा कारमधून आलेल्या चोरट्यांनी शिताफीने ही चोरी केली. या पद्धतीवरून टोळीत निष्णात मेकॅनिक आणि सॉफ्टवेअर तज्ज्ञ असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. गाड्या चोरून परराज्यात विकणारी टोळी यात सक्रिय असण्याची शक्यता असून सातारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कार पळवण्याची अशी आहे कार्यपद्धती सॉफ्टवेअर हॅकिंग : चोरटे पारंपरिक पद्धतीने कुलूप न तोडता आधुनिक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस किंवा स्कॅनरच्या साहाय्याने गाडीचे सेन्सर हॅक करतात. ईसीएम छेडछाड: दरवाजा उघडल्यानंतर थेट बॉनेट उघडून इंजिन कंट्रोल मॉड्यूलमध्ये (ईसीएम) छेडछाड केली जाते. नवीन कोडिंग : टॅबद्वारे गाडीचे मूळ कोडिंग बायपास करून नवीन चावीचे कोडिंग मॅच केले जाते, ज्यामुळे सायरन न वाजता इग्निशन तत्काळ सुरू होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *