Headlines

Balasaheb Thorat Slams Police Action Against Tribal Students in Mumbai


“आपल्या न्याय्य आणि घटनादत्त हक्कांसाठी नाशिक ते मुंबई असा शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून आलेल्या गरीब आदिवासी विद्यार्थ्यांशी संवादाची भाषा करण्याऐवजी सरकार पोलीस बळाचा वापर करून त्यांना बेड्या ठोकत आहे. आंदोलन करणे, प्रश्न विचारणे आणि न्याय मागण

.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय असलेल्या दादर येथील ‘टिळक भवन’मध्ये आश्रयाला थांबलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांवर मध्यरात्री झालेल्या कथित बेकायदेशीर पोलीस कारवाईवरून थोरात यांनी महायुती सरकारच्या कारभाराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

मध्यरात्री टिळक भवनात घुसून दबाव आणि धमक्या; हे वर्तन संतापजनक!

मध्यरात्री घडलेल्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी नाशिकहून पायी मुंबईत दाखल झालेले आदिवासी विद्यार्थी मुक्कामासाठी सुरक्षित जागा म्हणून टिळक भवनात विश्वासाने थांबले होते. मात्र, मध्यरात्री पोलिसांनी बेकायदेशीररीत्या काँग्रेसच्या प्रदेश मुख्यालयात घुसून विद्यार्थ्यांवर दबाव आणला. त्यांना धमकावून, बळाचा वापर करत चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेण्यात आले. हे कृत्य लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणारे आहे.”

संवादाऐवजी दडपशाही

“शांततेच्या आणि सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या या आदिवासी तरुण-तरुणींशी सरकारने सन्मानाने संवाद साधायला हवा होता. त्यांच्या शैक्षणिक, वसतिगृह किंवा इतर मूलभूत समस्या समजून घेऊन त्या सोडवणे हे कल्याणकारी राज्याचे कर्तव्य आहे. मात्र, सरकारने समस्या ऐकण्याऐवजी लाठी आणि खाकीचा धाक दाखवून आवाज दडपण्याचा प्रयत्न केला.”

विद्यार्थ्यांवर गुन्हेगारांसारखी कारवाई नको!

महाराष्ट्राच्या परंपरेची आठवण करून देत काँग्रेस नेत्याने सरकारला सुनावले. “महाराष्ट्र हा छत्रपती शाहू, फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा, कायद्याचे राज्य मानणारा आणि सामाजिक न्यायाचा आदर करणारा पुरोगामी प्रदेश आहे. अशा महाराष्ट्रात न्याय मागायला आलेल्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांना गुन्हेगारासारखे वागवले जात आहे. लोकशाहीत प्रश्न विचारणे किंवा आंदोलन करणे हा कधीही गुन्हा ठरू शकत नाही.”

आदिवासी विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीर

“सरकारच्या या अरेरावी, दडपशाही आणि हुकूमशाही प्रवृत्तीचा काँग्रेस पक्ष तीव्र शब्दांत निषेध करतो. आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरलेल्या प्रत्येक आदिवासी विद्यार्थ्याच्या लढ्यात काँग्रेस पक्ष खंबीरपणे पाठीशी उभा राहील आणि या अन्यायाविरुद्ध रस्त्यापासून विधिमंडळापर्यंत जाब विचारला जाईल,” असा सज्जड इशारा बाळासाहेब थोरात यांनी शेवटी दिला.

———————————————-

हेही वाचा…

काँग्रेस मुख्यालयात मध्यरात्री घुसून विद्यार्थिनींना बळजबरीने अटक?: अतुल लोंढेंचा थेट इशारा; हुकूमशाही सरकारने संविधान धाब्यावर बसवले, परिणाम भोगावे लागतील!

“राज्यातील आणि देशातील हुकूमशाही सरकारने सर्व कायदे, नियम आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पूर्णपणे धाब्यावर बसवण्याचे नीच कृत्य सुरू केले आहे. आपल्या न्याय्य हक्कांसाठी आझाद मैदानाकडे निघालेल्या आदिवासी विद्यार्थिनी मध्यरात्री विश्वासाने काँग्रेसच्या प्रदेश मुख्यालयात थांबल्या असताना, पोलिसांनी ‘टिळक भवन’मध्ये बेकायदेशीरपणे घुसून या तरुणींना फरपटत नेऊन अटक केली. सूर्यास्तानंतर महिलांना अटक न करण्याचा न्यायालयाचा आणि संविधानाचा स्पष्ट नियम असताना पोलिसांनी ही हिंमत कोणाच्या इशाऱ्यावर केली?” असा घणाघाती सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे. टिळक भवनात घडलेल्या या मध्यरात्रीच्या पोलीस कारवाईचा तीव्र निषेध करत अतुल लोंढे यांनी महायुती सरकारला थेट शब्दांत गंभीर इशारा दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.