Headlines

अप्पर वर्धा जलाशयातून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी:तिवसा तालुका काँग्रेसने केली, पावसाअभावी पिकांना फटका; 7 ऑक्टोबरपासून मिळणार पाणी




तिवसा तालुक्यातील तूर आणि कापूस पिकांना पावसाच्या खंडामुळे पुरेसा ओलावा मिळाला नाही, त्यामुळे वाढ खुंटली. यावर तिवसा तालुका काँग्रेसने मोर्शीतील अप्पर वर्धा जलाशयातून शेतीसाठी तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली. तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वैभव वानखडे यांनी शेतकऱ्यांचे नेतृत्व केले. खासदार बळवंतराव वानखडे यांनीही जलसंपदा विभागाशी पत्रव्यवहार केला. शेतकऱ्यांनी अधीक्षक अभियंता राजभोज आणि कार्यकारी अभियंता श्रीकांत उमप यांची भेट घेऊन पाणी सोडण्याबाबत निवेदन दिले. या बैठकीत आगामी रब्बी हंगामातील पाणी नियोजनावरही चर्चा झाली. हरभरा पिकासाठी पाणी उपलब्ध केल्यास शेतकऱ्यांना मदत होईल, असे शिष्टमंडळाने सांगितले. अधिकाऱ्यांनी सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले. शेतकरी आणि खासदारांच्या मागणीनंतर जलसंपदा विभागाने वेगाने हालचाली केल्या. त्यानुसार, ७ ऑक्टोबरपासून अप्पर वर्धा जलाशयातून पाणी सोडण्याचे नियोजन झाले आहे. धरणावर कार्यरत अधिकाऱ्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *