Headlines

पिकांची अवस्था, पाणी उपलब्धता, आवश्यक सिंचनाबाबत शेतकऱ्यांनी मांडल्या समस्या:शंकरपूर, सिरेसायगाव परिसरात आमदार रमेश बोरनारे यांचा दुष्काळी पाहणी दौरा‎




गंगापूर तालुक्यातील शंकरपूर, सिरेसायगाव, गोपाळवाडी येथे वैजापूर-गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दौरा केला. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने परिसरातील शेती पिकांवर निर्माण झालेल्या संकटाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आ. बोरनारे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांची झालेली अवस्था, पाण्याची उपलब्धता, पिकांना आवश्यक असलेले सिंचन तसेच संभाव्य पीक नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता असून, शासनाच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आ. बोरनारे यांनी यावेळी सांगितले. तसेच शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी संबंधित प्रशासनाशी चर्चा करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी बाजार समितीचे उपसभापती अनिल चव्हाण, राजेश्वर हिवाळे, बाळासाहेब चव्हाण, भिकन पाटील पोळ, साहेबराव पा.पोळ, रवींद्र पोळ, बद्रीनाथ चव्हाण, चंदन राजपूत, विजय काकडे, गोरखनाथ जगताप, पुंडलिक गवळी, दिगंबर गवळी, बाबासाहेब गव्हाने, राम धोत्रे, नानासाहेब धोत्रे, सरपंच करुणा पोळ, उपसरपंच उदलसिंग कहाटे, तंटामुक्तीचे अध्यक्ष कैलास पोळ, ग्रामपंचायत सदस्य सुनील पोळ, विठ्ठलसिंग कहाटे, प्रकाश कहाटे, अनिल पोळ, तलाठी गायकवाड, गटसचिव राजाराम शिरसाट, धनराज कहाटे यांच्यासह स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसेना तालुका समन्वयक सुनील पोळ यांनी सूत्रसंचालन व सर्वांचे आभार मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *