Headlines

चारा टंचाईवर मात करण्यासाठी कृषी विभागाची मोहीम!:औंढा नागनाथ तालुक्यात किमान 100 हेक्टरवर रब्बी ज्वारी व चारा पिकांच्या लागवडीचे नियोजन




औंढा नागनाथ तालुक्यामध्ये संभाव्य चारातनच्या लक्षात घेता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात किमान 100 हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारी व चारा पिकांची लागवड होईल याबाबतचे नियोजन करणे सूचना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांनी बुधवारी दिल्या आहेत. ​पंचायत समिती, औंढा नागनाथ येथे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली संभाव्य चारा टंचाई व उपाययोजनांसंदर्भात महत्त्पूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीस गटविकास अधिकारी गोपाल कलारे सहायक आयुक्त (पशुसंवर्धन) डॉक्टर शिवाजी बुचाले, विस्तार अधिकारी प्रदीप बोंढारे यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषी) यांसह विविध विभागांचे अधिकारी आणि प्रशासक व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले ​सध्याच्या स्थितीनुसार उपलब्ध चारा डिसेंबर महिन्यापर्यंत पुरेल, परंतु भविष्यात चारा टंचाई भासू नये यासाठी आगामी काळातील नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कृषी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील किमान 100 एकर क्षेत्रावर चारा लागवड होईल याबाबतचे नियोजन करावे. या संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधून रब्बी ज्वारी व चारावर्गीय पिके घेण्याबाबत होणारे फायदे त्यांना समजून सांगावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. पशुसंवर्धन विभागाकडून चारा टंचाई प्रवण गावातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्याचे निर्देश देण्यात आले. ​रबी हंगामात हरभरा व गहू पिका ऐवजी पाणी कमी लागणाऱ्या रब्बी ज्वारी लागवडीस प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून जनावरांना चारा आणि शेतकऱ्यांना ज्वारी विक्रीतून नफा मिळेल असेही त्यांनी स्पष्ट केले. खरीप हंगामातील पिकांचे अवशेष न जळता त्यावर प्रक्रिया करून त्याचे सकस चाऱ्यात रूपांतर करावे. ​पशुसंवर्धन विभागामार्फत चारा बियाणे वाटप: प्रति लाभार्थी रुपये 6000/- पर्यंतचे दर्जेदार चारा बियाणे उपलब्ध करून दिले जाणार असून यासाठी शेतकऱ्यांनी mmddp.com (VMDDP) या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे असे त्यांनी स्पष्ट केले. पाण्याची उपलब्धता असलेल्या क्षेत्रामध्ये व दुधाळ जनावरांसाठी प्राधान्याने चारा लागवड करण्यावर भर द्यावा असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांना 50% अनुदानावर रुपये 15000/- च्या मर्यादेत कड्बा कटर उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
​व्हीग्राम-जी योजना: सदर योजनेत 141 लाभार्थ्यांच्या शेतात चारा लागवड करण्यात आली असून डिसेंबरपर्यंत प्रत्येक गावात किमान 10 लाभार्थ्यांच्या शेतात कुरण लागवडीची कामे करण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही ठोंबरे यांनी यावेळी दिल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *