![]()
आपल्या दमदार अभिनयाने चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज (८ ऑक्टोबर) वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. गोव्यातील डोना पावला येथील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती समोर आली असून, सध्या त्यांचे पार्थिव गोवा मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आले आहे. या दुःखद घटनेवर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. ४५ मिनिटे शर्थीचे प्रयत्न, पण डॉक्टरांना अपयश नाना पाटेकर यांना गोव्यातील डोना पावला येथील घरी छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तत्काळ एका फ्लॅटवर वैद्यकीय पथक पाठवण्यात आले. त्यावेळी ते उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. वैद्यकीय पथकाने त्यांना ‘कार्डियाक मसाज’ देऊन तातडीने मणिपाल रुग्णालयात आणले. रुग्णालयाचे कर्करोग विभाग प्रमुख डॉ. शेखर सालकर आणि त्यांच्या पथकाने नाना पाटेकर यांना वाचवण्यासाठी सलग ४५ मिनिटे ‘सीपीआर’ (CPR) दिला. मात्र, प्रयत्नांची शर्थ करूनही त्यांना यश आले नाही. अखेर, पहाटे ५.२० वाजता वैद्यकीय पथकाने त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर पार्थिव कुटुंबीयांकडे सोपवणार नाना पाटेकर यांचा मृत्यू अचानक झाल्याने हे प्रकरण ‘मेडिको-लीगल’ (वैद्यकीय-कायदेशीर) स्वरूपाचे मानले जात आहे. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून आज त्यांचे शवविच्छेदन केले जाणार आहे. सध्या नाना पाटेकर यांचे पार्थिव गोवा मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्य गोव्यात पोहोचल्यानंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून पार्थिव त्यांच्या सुपुर्द केले जाईल. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, या सर्व प्रक्रियेत राज्य सरकारकडून कुटुंबीयांना जी काही मदत हवी आहे, ती तातडीने पुरवली जात आहे. ‘माझा एक जवळचा मित्र हरपला’ – मुख्यमंत्री प्रमोद सावंत नाना पाटेकर यांच्या निधनानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अत्यंत भावूक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “मला खूप दुःख होत आहे की नानांचे गोव्यात निधन झाले. नाना पाटेकर माझे चांगले मित्र होते, गोव्यात आले की ते आवर्जून माझ्या घरी यायचे. नाना भेटले की कायम शेतकऱ्यांबद्दल चर्चा करायचे. समाजातील गरीब लोकांसाठी गोव्यातही काम करण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून गोव्यातही ते मोठे काम उभे करणार होते. आज मी माझा एक अत्यंत जवळचा मित्र गमावला आहे.” नाना पाटेकर यांच्या निधनाने सिनेसृष्टीसह सामाजिक क्षेत्रातही मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या पार्थिवावर पुण्यात अंतिम संस्कार केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ———– संबंधित बातम्या वाचा.. नाना पाटेकर यांचे वयाच्या 75व्या वर्षी निधन:100 हून अधिक चित्रपट, 3 राष्ट्रीय, 4 फिल्मफेअर पुरस्कार; कारगिल युद्धादरम्यान सैन्यासोबत होते ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज सकाळी निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या गोव्यातील घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर सुमारे 45 मिनिटे सीपीआर (CPR) देण्यात आले, परंतु त्यांचा जीव वाचवता आला नाही. डॉ. शेखर साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांचे पहाटे 5वाजून 20 मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर वैद्यकीय-कायदेशीर खटला (MLC) दाखल करण्यात आला असून, शवविच्छेदन केले जाईल. सविस्तर वाचा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन:संवेदनशील, अष्टपैलू अन् करारी अभिनेता गमावला; नानांच्या निधनावर राजकीय नेत्यांकडून शोक व्यक्त भारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू, दिग्गज आणि आपल्या सखोल अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज सकाळी निधन झाले आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी गोव्यातील आपल्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील घरी असताना त्यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली पण त्यांचा जीव वाचवता आला नाही. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वात आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. सविस्तर वाचा
Source link
गोव्यातही शेतकऱ्यांसाठी 'नाम'चं काम उभं करायचं होतं, पण…:गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितली नाना पाटेकरांची 'ती' अपूर्ण इच्छा