Headlines

तात्काळ निवडणुका घ्या, भाजप औषधालाही उरणार नाही:मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दरदिवशी दिल्लीत काय करतात?- संजय राऊत




एसआयआरचे समर्थन म्हणजे घोटाळा करणे असे होत नाही, केवळ मृत व्यक्तीची नावे मतदारयाद्यांमधून काढणे असे असते, किंवा त्या जागेवर राहत नाही त्यांचा शोध घेणं हा आहे. केवळ एखाद्या भागातून शिवसेनेला मतदान होत आहे म्हणून ती नावे काढायची, बंगालमधील एक वर्ग तृणमूल काँग्रेसला मतदान करतो म्हणून त्याला मतदानापासून वंचित ठेवायचे याला एसआयआर म्हणत नाही. यावर पोस्टकरत काही ज्ञानेशकुमारचे समर्थन होत नाही. निवडणूक आयोगाने फडणवीस आणि भाजपला काय वकील म्हणून नेमले आहे का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की, ज्ञानेशकुमार यांना समोर येऊ द्या, ते कुठे भूमिगत झाले आहेत. दोन निवडणूक आयुक्तांनी त्यांना विरोध केला आहे मग हे प्रकरण पेटले हे फडणवीस यांना लक्षात यायला हवे. या लोकांना जर पदावरुन बाजूला केले तर ते लोकं सरकारविरोधात बोलतील त्यांच्यावर दबाव आणत कसे काम करायला लावले हे सांगतील म्हणून त्यांना पदावरुन बाजूला केले जात नाही. ज्ञानेशकुमारांनी राजीनामा देत माफीचे साक्षीदार व्हावे. ड्युप्लिकेटचा खेळ सुप्रीम कोर्टच संपवणार संजय राऊत म्हणाले की, देशात आणि महाराष्ट्रात वातावरण बदलत आहेत. मूळ शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची आहे. आता या ड्युप्लिकेटचा खेळ सुप्रीम कोर्टच संपवणार आहे. ज्या पद्धतीने सुनावणी पुढे चालली आहे. शिवसेनेचे तुकडे करताना ज्या अघटनात्मक पद्धतीने निवडणूक आयोग आणि तेव्हाच्या सुप्रीम कोर्टाने जी पाप केली त्याच पापाविरोधात निवडणूक आयोगाविरोधात देशात आंदोलन सुरू झाले आहे. 2024मध्ये विधानसभेत शिवसेनाच जिंकली संजय राऊत म्हणाले की, 2024 साली विधानसभेत शिवसेनाच जिंकली आहे हे आता लोकांना पटायला लागले आहे. भारतामध्ये आणि राज्यात भाजप एकंदरित कसा जिंकला हे आता ज्ञानेशकुमार, फडणवीस आणि शिंदे यांचे कारनाम्यातून हा अकृत्रिम पराभव घडवण्यात आला. आता जर तातडीने ज्ञानेशकुमारांचा राजीनामा झाला आणि निवडणूक झाली तर भाजप हा पक्ष इथे औषधालाही राहणार नाही, असे जनमत उसळले आहे. आम्ही आशावादी आहोत. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बोलतच नाही संजय राऊत म्हणाले की, जनतेचे अनेक प्रश्न आहेत त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत नाहीत. एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार बोलत नाही. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दर एकदिवसाआड दिल्लीमध्ये असतात त्यांचे तिथे काय काम आहे माहिती नाही, पण जनता हे सर्व काही नोंद करत असते. महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ आहे त्यावर कोणीही सत्ताधारी गांभीर्याने बोलताना दिसून येत नाही. जमीनीवर काम करणारा महाराष्ट्रात सध्या एकच पक्ष आहे तो म्हणजे आमची शिवसेना आम्ही काम करणारच. ..10 तारखेनंतर पुन्हा दिल्लीत जाणार संजय राऊत म्हणाले की, आम्ही इंडिया आघाडीचे महत्त्वाचे घटक आहोत.संसदभवनापासून निवडणूक भवनापर्यंत जो 6 तारखेला मोर्चा झाला त्यामध्ये राहुल गांधी यांच्यासोबत सर्वांत पुढे मीच होतो. त्यानंतर आम्ही मुंबईत परत आलो. आमचे सर्व दौरे ठरलेले आहे. दिल्लीत कितीही मोठे आंदोलन झाले जेलमध्ये जावे लागले तरी आम्ही तयार आहोत. पण दिल्लीतील कार्यक्रम अचानक ठरले आहेत ते पूर्वनियोजित नव्हते. आमचे महाराष्ट्रातील कार्यक्रम ठरलेले असल्याने आम्ही 10 तारखेनंतर दिल्लीतील आंदोलनाला जाऊ. हे ही वृत्त वाचा भंडाऱ्यात भाजप खासदार भारती पारधींच्या वाहनाची दुचाकीला धडक, दोघे गंभीर:तुमसर-रामटेक महामार्गावर अपघात, अपघातग्रस्त वाहन पोलिसांनी घेतले ताब्यात
मध्य प्रदेशातील बालाघाट येथील भाजप खासदार भारती पारधी यांच्या भरधाव वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची भीषण दुर्घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. तुमसर-रामटेक राष्ट्रीय महामार्गावरील उसर्रा गावाजवळ झालेल्या या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणारे पंजाबमधील दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *