Headlines

Tushar Gandhi Detained by Mumbai Police; August Kranti Maidan Protest


केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे आयोजित करण्यात आलेल्या देशव्यापी आंदोलनाचे तीव्र पडसाद आता मुंबईतही उमटू लागले आहेत. दिल्लीतील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) आंदोलनाला पाठिंबा द

.

वांद्रे नॅशनल कॉलेज परिसरातून तुषार गांधींना उचलले

शनिवारी दुपारी साडेतीन वाजता मुंबईतील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानावर शांततापूर्ण आंदोलनाची हाक तुषार गांधी यांनी दिली होती. मात्र, ते घराबाहेर पडून आंदोलनासाठी जात असतानाच वांद्रे येथील नॅशनल कॉलेज परिसरात मुंबई पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतले. प्रत्यक्षदर्शी आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतर सलग तीन ते चार तास वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये फिरवण्यात आले. सुरुवातीला त्यांना वांद्रे पोलीस ठाण्यात नेले गेले, त्यानंतर सांताक्रूझ आणि जुहू पोलीस ठाण्यात हलवण्यात आले. अखेर त्यांना अंधेरी पश्चिम येथील डी. एन. नगर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

तुषार गांधींची सोशल मीडियावर पोस्ट

तुषार गांधी यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या समाजमाध्यमावर पोस्ट करत, “मला पोलिसांनी अटक करून अज्ञात स्थळी नेले आहे,” असा दावा केला. मात्र, मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले की त्यांना अटक करण्यात आलेली नसून केवळ प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ताब्यात (Detain) घेण्यात आले आहे. ‘हम भारत के लोग’च्या उपाध्यक्षा गुड्डी एस. एल. यांना अंधेरी परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेले आहे.

परवानगीवरून पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद

या आंदोलनाच्या अधिकृत परवानगीवरून पोलीस आणि आयोजकांमध्ये तीव्र मतभेद समोर आले आहेत. गावदेवी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑगस्ट क्रांती मैदानावर आंदोलनासाठी कोणतीही लेखी परवानगी मागण्यात आलेली नव्हती आणि परवानगी दिलीही गेली नव्हती. सर्वोच्च न्यायालयाच्या एका मार्गदर्शक निर्देशानुसार तसेच हे ऐतिहासिक मैदान भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाशी संबंधित असल्याने तिथे अशा आंदोलनांना परवानगी देता येत नाही.

आयोजकांचे प्रत्युत्तर

गुड्डी एस. एल. यांनी पोलिसांचा दावा फेटाळत सांगितले की, तुषार गांधी शहराबाहेर असतानाच पोलिसांना रीतसर ईमेल पाठवून पूर्वपरवानगी मागण्यात आली होती; मात्र पोलिसांनी त्याला कोणतेही उत्तर दिले नाही. उलट पोलिसांकडून तुषार गांधी यांना वारंवार फोन करून लोकेशन विचारले जात होते आणि आंदोलन न करण्याचा दबाव आणला जात होता.

विजय वडेट्टीवार यांची टीका…

तुषार गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले, “महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनाच पोलिसांनी ताब्यात घेतले; लोकशाहीत आंदोलनाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न का? जंतर-मंतर येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुढे आलेले महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना अंधेरीतील डी. एन. नगर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. ‘हम भारत के लोग’ या संघटनेच्या सदस्यांनी आज दुपारी ३.३० वाजता ऑगस्ट क्रांती मैदानात जमण्याचे नियोजन केले होते. मात्र, त्यापूर्वीच तुषार गांधी यांना ताब्यात घेण्यात आले. ज्या देशात महात्मा गांधींनी सत्याग्रहाच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध लढण्याचा मार्ग दाखवला, त्याच देशात आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेतले जात असेल, तर लोकशाहीतील अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकाराबाबत प्रश्न उपस्थित होणारच! आवाज दाबून प्रश्न संपत नाहीत, उलट ते अधिक तीव्र होतात. लोकशाहीत विरोधाचा आवाज ऐकला गेला पाहिजे, दडपला नाही! दडपशाही कितीही असो, लोकशाहीचा आवाज थांबता कामा नये!”

दिल्ली विमानतळावर हायव्होल्टेज ड्रामा: अभिजीत दिपके, सौरव दास आणि ध्रुव राठी अटकेत

दिल्लीतील जंतरमंतरवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सीजेपी आणि विविध विद्यार्थी संघटनांनी शनिवारी भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आणि दिल्लीत दाखल होणाऱ्या नेत्यांची मोठी नाकेबंदी केली. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांचे विमान दिल्ली विमानतळाच्या धावपट्टीवर लँड होताच पोलिसांनी अत्यंत वेगाने हालचाली केल्या. विमान थांबताच दिल्ली पोलिसांचे एक विशेष पथक थेट विमानात शिरले आणि त्यांनी अभिजीत दिपकेंना विमानातूनच थेट ताब्यात घेतले.

सौरव दास आणि ध्रुव राठींनाही पकडले

काही वेळातच कार्यकर्ते सौरव दास यांनाही दिल्ली विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. तर दुसरीकडे, या आंदोलनाला पाठिंबा देणारे देशातील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ध्रुव राठी यांनाही दिल्ली पोलिसांनी दिल्लीत ताब्यात घेतले आहे.

महाराष्ट्रातून दिल्लीकडे जाणाऱ्या 200 हून अधिक कार्यकर्त्यांची नाकेबंदी

दिल्लीतील जंतरमंतर आंदोलनात सहभागी होण्यासाठी देशभरातून हजारो कार्यकर्ते दिल्लीकडे कूच करत होते. महाराष्ट्र पोलीसही गेल्या दोन दिवसांपासून हाय अलर्टवर होते. दिल्लीला जाणाऱ्या संशयित आंदोलकांवर पाळत ठेवून मुंबई पोलिसांनी शुक्रवारीच 200 हून अधिक कार्यकर्त्यांना नोटिसा देऊन ताब्यात घेतले होते, जेणेकरून ते राजधानीत पोहोचू नयेत.

तुषार गांधींचा लढा

तुषार गांधी यांनी यापूर्वी 4 तारखेला दादर येथे झालेल्या आंदोलनातही प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. 1942 मध्ये महात्मा गांधींनी ज्या ऑगस्ट क्रांती मैदानातून इंग्रजांना ‘भारत छोडो’चा नारा दिला होता, त्याच मैदानातून आज निवडणूक आयोगाच्या मनमानीविरोधात एल्गार पुकारण्याचा त्यांचा मानस होता. मात्र, पोलिसांनी कारवाई करत मैदानात पोहोचण्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेतल्याने मुंबईतही आंदोलक आणि नागरी हक्क कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

—————————————-

हेही वाचा….

अभिजीत दिपकेंना ताब्यात घेताच आई भावुक:म्हणाल्या- हातात काठ्या घेऊन रील्स बनवणाऱ्यांना मोकळे रान अन् देशासाठी लढणाऱ्या माझ्या मुलाला बेड्या?

पुण्यातील एमपीएससी आंदोलन आणि दिल्लीतील देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना, ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. दिपकेंना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून, आईला माध्यमांसमोर बोलताना अश्रू अनावर झाले. तर, “हे सरकार लोकशाही मानत नाही, आणीबाणीनंतर पहिल्यांदाच देशात अशी हुकूमशाही सुरू आहे,” असा संतापजनक आरोप करत दिपके यांच्या वडिलांनी केंद्र व राज्य सरकारवर थेट हल्ला चढवला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.