Headlines

शनिअमावस्या, 4 लाख भाविक नतमस्तक:दुष्काळ व उष्णतेचा गर्दीवर परिणाम; थंड पाण्याचे तुषार, स्वतंत्र दर्शन रांगांमुळे दिलासा‎




श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे शनी अमावस्येनिमित्त शनिवारी सुमारे ४ लाख भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले. यंदा दुष्काळ आणि तीव्र उष्णतेचा भाविकांच्या गर्दीवर परिणाम झाला. स्वतंत्र दर्शन रांगा, वाहनतळ, मदत केंद्रे, प्राथमिक आरोग्य सुविधा आणि थंड पाण्याच्या तुषारांमुळे भाविकांना दिलासा मिळाला. दरम्यान, १६ मे रोजी शनी अमावस्या आणि शनिजयंतीचा योग आल्याने सुमारे ८ लाख भाविकांनी दर्शन घेतले होते. शनिवारी मध्यान्ह आरती झिम्बाब्वे येथील उद्योजक जयेश शहा यांच्या हस्ते झाली. तेल अर्पणासाठी स्वतंत्र संकलन व्यवस्था करण्यात आली होती. सुमारे ४०० फूट पाइपलाइनद्वारे तेल शनिमूर्तीपर्यंत पोहोचवण्याची सोय होती. व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी भाविकांसाठी स्वतंत्र स्वागत कक्ष, दर्शन रांग, अभिषेक कक्ष आणि पोलीस मदत कक्ष उभारण्यात आले होते. सहायक पोलीस निरीक्षक दीपक धनवटे यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले. देवस्थानचे प्रशासक प्रवीण गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे आणि जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले यांनी व्यवस्थेची जबाबदारी सांभाळली. उन्हापासून बचावास उपाय { शनी चौथऱ्याच्या दोन्ही बाजूंना मिनी स्प्रिंकलर. { फरशीवर पांढऱ्या कूलपेंटचे लेपन. { स्वतंत्र दर्शन रांगा आणि वाहनतळाची व्यवस्था. { चौकशी व मदत केंद्रांसह प्राथमिक आरोग्य सुविधा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *