Headlines

देशात अणीबाणीसदृश परिस्थिती, मोदी-शहा पर्व लवकरच संपणार:तुषार गांधींना अटक करणाऱ्या फडणवीस-पोलिसांनी माफी मागावी- संजय राऊत




दिल्लीत सीजेपीच्या लोकांना ताब्यात घेतले म्हणून काही आंदोलन थांबले नाही,देशभरात हे आंदोलन झाले. जर काही माजी मुख्यमंत्री, खासदार यांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीत पोलिसांचे राज्य आहे, म्हणजे देशात आणीबाणी लागली आहे हे मान्य केले पाहिजे. हिटलरने त्याच्या अखेरच्या काळामध्ये याच पद्धतीचे वर्तन जर्मनीमध्ये केले होते. त्यामध्ये आंदोलने दडपणे, विरोधकांना अटक करणे, लोकांना घरात कोंडून ठेवणे आणि लॉकडाऊन लावणे हे हिटलरने विरोधक त्यांच्या राजवटीविरोधात उतरले तेव्हा केले होते,असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, तुषार गांधी यांना ज्या ठिकाणी अटक करण्यात आली त्या ठिकाणी काल आम्ही गेलो तिथे आदित्य ठाकरे यांच्यासोबत ठिय्या मांडला आणि तुषार गांधींची सुटका करुण घेतली. भाजपचे 4 प्रमुख नेते आज वेगळ्या भूमिकेत आहेत. जे भाजपच्या विचारधारेचे स्तंभ आहेत ते वेगळ्या भूमिकेत आहेत हे मी सांगू शकतो. इंदिरा गांधी यांच्यासोबतचे नेते त्यांना सोडून गेले म्हणून त्यांच्या सत्तेला मोठा धक्का बसला त्याच दिशेने भाजपची वाटचाल सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांचे सरकार पुढच्या 6 ते 7 महिन्यात दिसणार नाही. आता त्यांचे राज्य बंदूकीच्या बळावर सुरू आहे. मार्च-एप्रिलमध्ये मोदी पंतप्रधान राहणार नाही संजय राऊत म्हणाले की, भारतामध्ये सुद्धा आज तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. ही खदखद केवळ विरोधकांमध्ये आहे असे नाही तर भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा अशी खदखद तुम्हाला दिसू लागेल. मार्च ते एप्रिल महिन्यात देशामध्ये राजकीय परिवर्तन होईल. पंतप्रधानपदी मोदी राहणार नाही. आणीबाणीनंतर जनता पक्ष स्थापन होण्याची प्रक्रिया ज्यावेळी सुरू झाली त्यावेळी काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते त्यांचा पक्ष सोडून गेले. भाजपामध्येसुद्धा तशीच खदखद आहे. मोदी यांच्याविरोधातील आंदोलनावेळी कोणताही नेता मोदी किंवा शहा यांची बाजू ठामपणे मांणडण्यासाठी उभा राहताना दिसून येत नाही. याचा अर्थ भाजपमधील मोदी आणि शहा पर्व याचा अस्त होत आहे. अनेक प्रमुख नेते भविष्यात मोदी-शहांपासून दूर जात वेगळा निर्णय घेऊ शकतात अशा हालचाली भाजपमध्ये सुरू आहेत. त्यांचे दृश्य लवकरच तुम्हाला दिसेल. सरकारकडून सत्ता टिकवण्यासाठी सैन्य बलाचा वापर संजय राऊत म्हणाले की, मोदी-शहा यांच्याकडून सैन्याचा वापर करत सत्ता टिकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. काल दिल्लीतील चित्र सर्वांनी पाहिले आहे. जम्मू-कश्मीर, आसाम, छत्तीसगड, मधील सशस्त्रदल दिल्लीतील रस्त्यावर उतरवण्यात आले पण तरीही लोकं रस्त्यावर उतरले. मुंबईत सुद्धा आंदोलन झाले, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना काल मुंबईमध्ये पोलिसांनी अटक केली त्यांना लाज वाटली पाहिजे. तुम्ही ज्यांच्यामुळे स्वातंत्र उपभोगत आहात त्यांचे वंशज देशातील हुकुमशाहीविरोधात आंदोलन करत असतील तर तुम्ही त्यांना अटक करतात. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पोलिसांना याबद्दल माफी मागावी लागेल. मस्क यांनी सुद्धा भाजपला फंडिंग केले असावे संजय राऊत म्हणाले की, भाजपला कोणी फंडिंग केले नाही हे आता मस्क यांनी सांगितले पाहिजे. श देशातील प्रत्येक उद्योगपतीने आणि भ्रष्टाचाऱ्याने ज्यांच्यावर ईडीचे खटले दाखल झाले त्यांना अटक झाल्या अशा सर्वांनीच भाजपला फंड दिले आहेत. काही चीनच्या कंपन्यानी सुद्धा भाजपला फंड दिले आहेत. तर मस्क यांनी सुद्धा गैर मार्गाने भाजपला फंड दिला असू शकतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *