Headlines

ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी तिवसा येथे इंडिया आघाडीची निदर्शने:'जेन-झी' आंदोलनाला समर्थन देत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली




तिवसा येथे इंडिया आघाडीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जोरदार निदर्शने केली. दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या ‘जेन-झी’ आंदोलनालाही त्यांनी पाठिंबा दिला. या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उबाठा) सह इंडिया आघाडीतील अनेक घटक पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले. सकाळी ११ वाजता तिवसा मार्केट परिसरात जमा होऊन त्यांनी पेट्रोल पंप चौकात केंद्र सरकार आणि मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात घोषणाबाजी केली. ‘ज्ञानेशकुमार राजीनामा द्या’, ‘वोट चोरी नही चलेगी’ अशा घोषणा देत आंदोलकांनी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याची मागणी केली. दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा निषेध करत, ताब्यात घेतलेल्यांना तात्काळ सोडण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. भाई भूषण यावले, दिलीप शापामोहन यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *