Headlines

पहिल्या माळेला रेणुका मातेच्या चरणी 11000 भाविक:15 मिनिटांत दर्शन, चांदवडमध्ये नवरात्रोत्सवाला प्रारंभ; तहसीलदार चव्हाण यांच्या हस्ते पूजा‎



उत्तर महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चांदवड निवासीनी राजराजेश्वरी कुलस्वामिनी श्री रेणुका मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला रविवार (दि. ११) पासून उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्याच माळेला ११ हजार भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी

.

शनिवारी (दि. १०) रात्री १२ वाजता कळस व ध्वजपूजन झाले. त्यानंतर रविवारी (दि. ११) पहाटे महाभिषेक व महापूजा झाली. तहसीलदार अनिल चव्हाण यांच्या हस्ते सपत्नीक घटस्थापना करण्यात आली. { उर्वरित पान. २

असे होणार धार्मिक विधी नवरात्रोत्सवाच्या काळात दररोज सायंकाळी साडेआठ वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते महाआरती होणार आहे. तसेच दररोज पहाटे ४ वाजता महाअभिषेक, सकाळी ८.३० वाजता पालखी मिरवणूक, दुपारी १२ वाजता महानैवेद्य आरती, होमहवन आणि देवी भागवत कथा सोहळा आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

२४ तास वैद्यकीय सेवा उत्सवकाळात नेमिनाथ जैन संस्थेच्या आर. पी. चोरडीया हॉस्पिटल आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय उपचार केंद्रामार्फत भाविकांना २४ तास वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. श्री रेणुका देवी ट्रस्ट प्रशासनाकडून वाहनतळ, पिण्याचे पाणी, वीजदिवे यांसह सुविधा पुरविण्यात येत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *