![]()
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठऐवजी (ऑब्जेक्टिव्ह) वर्णनात्मक (डिस्क्रिप्टिव्ह) करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यातील खासगी क्लासेसचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. पुण्यात स्पर्धा परीक्षा क्लासेस, होस्टेल, मेस आणि स्टेशनरी मिळून वर्षाला सुमारे 750 ते 800 कोटींची उलाढाल होते. मात्र, नवीन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची संख्या घटल्याने पुण्यातील 50 ते 60 टक्के क्लासेस सध्या थेट तोट्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचा “वर्ग-अ’ ऐवजी सरळ सेवेकडे वाढला कल यूपीएससीच्या सुमारे 1,000 जागांपैकी महाराष्ट्रातील केवळ 50 ते 52 विद्यार्थीच उत्तीर्ण होतात. हा टक्का वाढवण्यासाठी तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार 2025 पासून एमपीएससीत वर्णनात्मक पद्धत लागू करण्यात आली. तथापि, वर्णनात्मक परीक्षेची तयारी दीर्घकाळ चालणारी असल्याने विद्यार्थी आता वर्ग ‘अ’ पदांऐवजी वर्ग ‘ब’, ‘क’ आणि सरळसेवा भरतीकडे वळू लागले आहेत. त्यामुळे एमपीएससीच्या मुख्य प्रवाहात येणाऱ्या नव्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अचानक रोडावले आहे. परिणामी, पुण्यातील गल्लीबोळांत चालणारे अनावश्यक क्लासेस बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. दिल्लीतील ब्रँड्सचे पुण्यात संस्थांना आव्हान विद्यार्थी पूर्वी यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीला जात असत. पुण्यातील ही बाजारपेठ ओळखून आता दिल्लीतील शुभ्रा रंजन, दृष्टी आयएएस, नेक्स्ट आयएएस आणि श्रीराम आयएएस यासारख्या संस्थांनी पुण्यात थेट केंद्रे सुरू केली. गांभीर्याने विचार करावा “एमपीएससीची परीक्षा पद्धत कोणती असावी, यापेक्षा आयोगाचे शुद्धीकरण होणे गरजेचे आहे. व्ही. राधा समितीचा अहवाल आल्यावर पद्धतीबाबत स्पष्टता येईल, तोपर्यंत सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा गांभीर्याने विचार करायला हवा.’ – रोहित पवार, आमदार वर्णनात्मक पद्धतच हवी “एमपीएससीचा दर्जा यूपीएससीसारखा करण्यासाठी वर्णनात्मक पद्धतच आवश्यक आहे. देशातील इतर राज्यांत ही पद्धत यशस्वी आहे. क्लासेस बंद पडत असल्याने काही घटकांकडून वस्तुनिष्ठ पद्धतीचा अट्टहास धरला जात आहे. -अजिनाथ केदार, परीक्षार्थी एमपीएससी पॅटर्नचा तिढा नेमका काय?
मोठ्या ब्रँड्सशी स्पर्धा करणे आता पुण्यातील स्थानिक क्लासेसना अवघड झाले आहे.
अभ्यासिकेपासून मेसपर्यंतचे आर्थिक गणित कोलमडले
प्रश्न 1 : परीक्षा पद्धत का बदलण्यात आली?
उत्तर : 2012 पासून एमपीएससीत वस्तुनिष्ठ पद्धत होती. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना यूपीएससीच्या लेखी (वर्णनात्मक) परीक्षेत अडचणी येत होत्या. देशातील 26 राज्यांत नागरी सेवांसाठी वर्णनात्मक पद्धत असल्याने महाराष्ट्रातही ती लागू केली.
प्रश्न 2 : विद्यार्थी विरोध का करत आहेत?
उत्तर : वर्णनात्मक परीक्षेत यश मिळवण्यासाठी 2 ते 3 वर्षे लागतात. पेपरफुटीच्या घटना, वेळेवर न होणाऱ्या परीक्षा आणि लांबलेली भरती प्रक्रिया यामुळे उमेदीची वर्षे वाया जाण्याची भीती विद्यार्थ्यांना वाटते.
प्रश्न 3 : यावर तोडगा काय असू शकतो?
उत्तर : सायबर सिक्युरिटी आणि एआयसारख्या आधुनिक विषयांचा समावेश करून काठिण्य पातळी वाढवावी लागेल.
पुण्यात सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन सोमवारी मागे घेण्यात आले.
Source link
एमपीएससी ‘डिस्क्रिप्टिव्ह’; पुण्याचे 800 कोटींचे कोचिंग मार्केट संकटात:2025 पासून एमपीएससीत वर्णनात्मक पद्धत