Headlines

‘पार्टी दे,नाहीतर खतमच करतो’ म्हणत मित्राने खुपसला मित्राच्या छातीत चाकू:संभाजीनगरच्या हर्सूल परिसरातील थरार; अल्पवयीन आरोपीसह चौघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा




‘खूप दिवस झाले पार्टी दिली नाही. आज पार्टी दे, नाहीतर इथेच खतम करतो,’ अशी धमकी देत एका अल्पवयीन मित्रानेच मित्राच्या छातीत चाकू खुपसला. ही घटना हर्सूल परिसरात घडली. त्यानंतर उपचारासाठी घाटीत नेण्याचा बहाणा करून जखमी तरुणाला रेल्वे स्टेशन भागातील मोकळ्या मैदानात नेले व त्याच्या डोळ्यात आणि पाठीवर वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार १० ऑक्टोबर रोजी घडला. या प्रकरणी हर्सूल पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह त्याच्या तीन साथीदारांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. जखमी तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा १८ वर्षांचा मुलगा जहांगीर कॉलनीतून सिटी चौककडे पायी चालला होता. त्या वेळी अल्पवयीन मित्राने त्याला अडवून पार्टीची मागणी केली. पैसे नसल्याचे सांगताच आरोपीने छातीत चाकू खुपसला. त्यानंतर “तुला घाटी दवाखान्यात घेऊन जातो,” असे सांगत इतर तीन मित्रांच्या मदतीने हमालवाडा येथील मोकळ्या मैदानात नेले. तेथे चौघांनी मिळून चाकूने वार केल्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. रक्तबंबाळ अवस्थेत लिफ्ट घेऊन गाठले रुग्णालय जखमी तरुणाने रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला लिफ्ट मागितली. त्या व्यक्तीने घाटीच्या अलीकडे सोडल्यानंतर तो तरुण पायी चालत आपत्कालीन वॉर्डात पोहोचला. तेथील परिचारिकेने तरुणाच्या मोबाइलवरून त्याच्या वडिलांना माहिती दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *