Headlines

एमपीएससी आंदोलनातून विद्यार्थ्यांना काय मिळाले:आ. विक्रम पाचपुते यांचा आ. रोहित पवारांना सवाल‎




एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी प्रतिनिधींशी चौथ्यांदा चर्चा करून सकारात्मक मार्ग काढल्याचा दावा भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी केला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांना प्राधान्य दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानताना, आंदोलनातून विद्यार्थ्यांना नेमके काय मिळाले आणि राजकीय फायदा कोणाला झाला, याचे उत्तर रोहित पवार यांनी द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले. पाचपुते म्हणाले, ३० सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थी प्रतिनिधींशी चर्चा करून बहुतांश मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र, एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा घेणे मुख्यमंत्र्यांच्या थेट अधिकारक्षेत्रात येत नसल्याचे आपण वारंवार स्पष्ट केले होते. घटनात्मक मर्यादा असतानाही आंदोलन सुरू ठेवण्यामागील भूमिका स्पष्ट करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनाच्या अखेरच्या टप्प्यात विद्यार्थी आणि राजकीय कार्यकर्त्यांतील फरक स्पष्ट झाल्याचा दावाही त्यांनी केला. यासंदर्भात आपल्याकडे व्हिडिओ असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या भवितव्यापेक्षा राजकीय लॉन्चिंग मोठे नाही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करणे हा लोकशाही अधिकार आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या भावनांचा वापर राजकीय प्रतिमानिर्मितीस होऊ नये. आंदोलनाच्या माध्यमातून रोहित पवार यांच्या राजकीय लॉन्चिंगचा प्रयत्न सुरू होता का, असा सवाल आ. पाचपुते यांनी केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *