![]()
शेवगाव येथे झालेल्या तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेत दहीगाव येथील नवजीवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कबड्डी संघांनी दुहेरी यश मिळविले. १७ वर्षांखालील गटात त्रिमूर्ती विद्यालय, शेवगाव, तर १९ वर्षांखालील गटात न्यू आर्टस् कॉलेज, शेवगावच्या संघाला पराभूत करून दोन्ही संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश निश्चित केला. ८ ते १० ऑक्टोबरदरम्यान विखे पाटील कॅम्पस येथे झालेल्या स्पर्धेत नवजीवनच्या खेळाडूंनी सांघिक समन्वय, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर विजय मिळविला. या संघांना मेहमूद पठाण व शौकत पठाण यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल प्राचार्य प्रा. डॉ. रमेश खैरे, उपप्राचार्य जयराम नांगरे, पर्यवेक्षक मच्छिंद्र पानकर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र घुले पाटील, सचिव चंद्रशेखर घुले, प्रशासकीय अधिकारी कारभारी नजन, समन्वयक विजय काशिद आणि ग्रामस्थांनीही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
Source link
"नवजीवन'चे कबड्डीत दुहेरी यश; दोन्ही संघ जिल्हास्तरावर:17 व 19 वर्षांखालील गटांत मिळवले विजेतेपद