Headlines

दिव्य मराठी इम्पॅक्ट‎:बीडच्या चंपावती विद्यालयात 3 नव्हे 295 विद्यार्थी बोगस; गुन्हा दाखल करण्याचे आदेश, शिक्षण विभागाकडून चौकशी सुरू


राज्यभर संचमान्यतेसाठी विद्यार्थ्यांचे प्रवेश विकत घेण्याचा गैरप्रकार गुरुवारी (८ ऑक्टोबर) ‘दिव्य मराठी’च्या वृत्तामुळे चव्हाट्यावर आला होता. प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षण उपसंचालक के. जी. दातखीळ यांनी बीडच्या चंपावती शाळेच्या संपूर्ण पटसंख्येची पडत

.

परंतु, प्रत्यक्षात हजेरीपट तपासणीत केवळ ९७३ विद्यार्थी आढळले. ३ नव्हे, तर २९५ विद्यार्थी दुसऱ्या शाळेत प्रवेशित असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे चंपावती शाळेचे मुख्याध्यापक सारंग जोशी यांना या गैरप्रकाराला जबाबदार धरून निलंबित केले आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. दिव्य मराठीने हा गैरप्रकार उघडकीस आणल्यानंतर शिक्षण विभागाने बीडच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांना पडताळणीचे आदेश दिले. या चौकशीसाठी ३ सदस्यीय समिती गठित केली होती. यामध्ये शिक्षण विस्तार अधिकारी यादव पल्लेवाड आणि उपशिक्षणाधिकारी मारुती जाधव होते.

दलालांवर गुन्हा दाखल होणार

चंपावती संस्थेने मुख्याध्यापक सारंग जोशी यांना निलंबित केले . या प्रकरणात दोषी मुख्याध्यापकासह सहभागी दलालांवरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश बीडच्या शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. – के. जी. दातखीळ, शिक्षण उपसंचालक

मुख्याध्यापकाची लेखी कबुली

समितीच्या अहवालानुसार, विद्यार्थ्यांचे प्रवेश अनवधानाने आयात झाले असून चूक लक्षात आल्यावर ते ड्रॉपबॉक्समध्ये टाकले, असा दावा मुख्याध्यापक जोशी यांनी केला. दिव्य मराठीत प्रसिद्ध वृत्त खरे असल्याची लेखी कबुली त्यांनी दिली. चुकून आलेले विद्यार्थी ७ ऑक्टोबरला ड्रॉपबॉक्समध्ये टाकल्याचा त्यांचा युक्तिवाद समितीने अमान्य केला. परिणामी, ९ ऑक्टोबरलाच त्यांच्या निलंबनाचे आदेश निघाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *