![]()
छत्रपती संभाजीनगरातील केंब्रिज चौक ते वाळूजच्या ओॲसिस चौकादरम्यानच्या प्रस्तावित अखंड उड्डाणपुलासाठी सध्याचे पाचही पूल पाडण्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जाहीर केले होते. पण ‘दिव्य मराठी’च्या माहितीनुसार एकही पूल न पाडता मर्जिंग-डिमर्जिंगसाठी जुने पूल वापरले जातील. त्यामुळे हे पूल ‘जैसे थे’ ठेवून त्या शेजारी 18 किमीचा नवा पूल उभारला जाणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी भूसंपादनाचीही गरज नसेल. मात्र क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुन्हा एकदा उंची वाढवण्याची गरज पडू शकते. या ठिकाणी ‘केबल स्टेड पूल’ बांधला जाईल. हा परिसर आणखी आकर्षक होईल. यासाठी 4,130 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मराठवाड्यातील हा सर्वाधिक लांबीचा उड्डाणपूल असणार आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ अर्थात एमएसआयडीसीने राज्य सरकारला 28 सप्टेंबरला तसा प्रस्ताव सादर केला आहे. जालना रोडवरील वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 17 सप्टेंबरला या उड्डाणपुलाची घोषणा केली होती. आता या प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. उभारणी करताना आधीचे पाचही पूल तसेच राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. समितीच्या मंजुरीनंतर 6 महिन्यांनी… एमएसआयडीसीच्या प्रस्तावावर अर्थ, महसूल, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अभिप्राय मागवले जातील. यात निधीच्या उपलब्धतेवर स्पष्टता येईल. अभिप्रायांमध्ये काही बदल, दुरुस्त्या होऊ शकतात. त्याप्रमाणे हे बदल केले जातील. हा प्रस्ताव ‘मंत्रिमंडळ पायाभूत विकास समिती’कडे पाठवला जाईल. तेथेही काही बदल व दुरुस्त्या सुचवल्या जाऊ शकतात. गरजेनुसार स्थळपाहणी होईल. बदल व दुरुस्त्यानंतर समिती या प्रस्तावाला अंतिम मंजुरी देईल. समितीच्या मंजुरीनंतर 6 महिन्यांनी डीपीआर अन् त्यानंतर निविदा प्रकाशित केली जाईल. तर पैशांची नासाडी टळेल एमएसआयडीसीकडे असे तंत्रज्ञान असेल तर उत्तमच आहे. यामुळे पैशांची नासाडी टळेल. पण नव्या पुलामुळे भविष्यात अपघात होऊ नये, लोकांचे प्राण जाऊ नये याची सर्व इंजिनिअर्सनी काळजी घेणे गरजेचे आहे. -संजय शिरसाट, पालकमंत्री पाडापाडीची गरज नाही एमएसआयडीसीने राज्य सरकारला प्रस्ताव सादर केला आहे. यात जुने पूल तसेच ठेवून नवा एकच 18 किमीचा अखंड पूल उभारण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. -के. एस. पाटील, कार्यकारी अभियंता, पीडब्ल्यूडी, मुंबई नवा पूल कसा उभारणार? मर्जिंग-डिमर्जिंग पद्धतीने नवीन 18 किमीचा पूल उभारला जाण्याचे प्रस्तावित आहे. भूसंपादन करावे लागेल? नाही, व्यावसायिक प्रतिष्ठाने असल्याने जमिनीच्या किमती अधिक आहेत. त्यामुळे पुलाच्या प्रोजेक्टची कॉस्ट वाढू शकते. जुने पूल पाडणार का? पाडापाडीने खर्च वाढेल. शिवाय उभारणीसाठी वेळ जाईल. म्हणून जुने पूल पाडणार नाहीत. तिथेच नवा पूल होईल. मग वापर कसा राहील ? नागरिकांना एन्ट्री-एक्झिटसाठी जुने पूल वापरता येतील. यामुळे वाहतुकीचे नियंत्रण केले जाईल. मर्जिंग-डिमर्जिंगचा वापर होईल 1 पाच पुलांच्या बाजूला नव्या पुलाचे बांधकाम करणार शहरात सिडको बसस्टँड, सेव्हन हिल्स, मोंढा नाका, क्रांती चौक, बाबा पेट्रोल पंप असे 5 उड्डाणपूल आहेत. यातील एकही पूल न पाडता सर्व पुलांच्या शेजारी नव्या पुलाचा विस्तार केला जाणार आहे. 2 भूसंपादन करण्याची गरज भासणार नाही जालना रोडवर व्यावसायिक प्रतिष्ठाने असल्यामुळे तिथे भूसंपादनाला मोठा खर्च व कायदेशीर अडथळेही निर्माण होऊ शकतात. ते टाळण्यासाठी याच रोडवर नवा अखंड पूल उभारण्याचे प्रस्तावित आहे. 3 क्रांती चौक पुन्हा सुशोभित करणार
क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुन्हा सुशोभीकरण केले जाईल. मुंबईच्या वांद्रे-वरळी सी-लिंकप्रमाणे “केबल स्टेड ब्रिज’चाही प्रस्तावात उल्लेख करण्यात आला आहे.
Source link
संभाजीनगरात जुन्या 5 पुलांपैकी एकही न पाडता बनेल अखंड पूल:केंब्रिज चौक ते वाळूजपर्यंतच्या 18 किमी उड्डाणपुलाचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर