Headlines

नालासोपाऱ्यात जिममध्ये तरुणींचे शोषण; 30वर व्हिडिओ जप्त, धर्मांतराचा दबाव:150 तरुणी अडकल्याचा संशय; मुख्य आरोपीसह तिघांवर गुन्हा



नवरात्रोत्सवात गरबा खेळणाऱ्या महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे नालासोपारा येथील एका गंभीर गुन्हेगारी प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. पश्चिमेकडील छेडानगर परिसरातील ‘वेबकॉर्न जिम’मधील या प्रकारानंतर पोलिसांनी मुख्य संशयित आरिफ अयुब शेख याला अटक

.

पीडितेच्या तक्रारीनुसार, आरिफने फिटनेस टिप्सच्या बहाण्याने मैत्री करून, लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केले. त्यानंतर खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन निकाह आणि धर्मांतरासाठी दबाव आणला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून मोबाईल डेटा आणि व्हिडिओ फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत. तर स्थानिक नेते प्रदीप मिश्रा यांनी ७० ते ८० तरुणींना लक्ष्य केल्याचा आणि हा आकडा १५० पार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे अन्य पीडितांनी ओळख उघड न होण्याची खात्री बाळगून पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.

तीन तरुणांनी आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले

रौनक यादव, सागर गायकवाड आणि कमलेश चौधरी हे तरुण ९ ऑक्टोबर रोजी जिममध्ये गेले असता, आरिफने नवरात्रीच्या काळात ३० ते ४० मुली आपल्याकडे येत असल्याचा दावा केला. यावरून संशय आल्याने तरुणांनी त्याचा मोबाईल तपासला असता, त्यात विविध तरुणींचे खासगी व्हिडिओ आणि फोटो आढळले. संशयित डेटा नष्ट करत असतानाच तरुणांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

वेबकॉर्न जिमकडे परवानाच नाही, तूर्तास टाळे ठाेकले

घटनेनंतर वेबकॉर्न जिम तात्पुरती बंद केली आहे. जिमचे ट्रेड लायसन्स व अग्निशामक दल ना हरकत प्रमाणपत्र पालिकेकडे नसल्याचे समोर आले असून, अनधिकृत आस्थापनांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गांभीर्य पाहून अनेक पालकांनी आपल्या मुलींचे जिम सदस्यत्व रद्द केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *