Headlines

सहा महिन्यांत 19 लढाया जिंकणाऱ्या महाराणी ताराबाईंचे नेतृत्व अद्वितीय:ॲड. लव्हाळे यांचे प्रतिपादन, महानायिकांच्या जीवनकार्यास उजाळा‎




जुने आरटीओ रस्त्यावरील मराठा सेवा संघाच्या जिजाऊ सांस्कृतिक भवनात मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड व ३२ कक्षांच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त सुरू असलेल्या ‘नऊ महानायिकांच्या जीवनकार्यावरील व्याख्यानमाले’चे पाचवे पुष्प ॲड. स्नेहा लव्हाळे यांनी गुंफले. ‘महाराणी ताराबाईंचे जीवन व कार्य’ या विषयावर मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर संकटाच्या वादळात सापडलेल्या स्वराज्याला सावरून नव्या उमेदीने उभे करण्याचे महान कार्य महाराणी ताराबाई यांनी केले. त्या स्वराज्यरूपी अग्नीची धगधगती ज्वाला आणि खऱ्या अर्थाने स्वराज्याच्या मुकुटमणी होत्या. शंभूराजे व छत्रपती राजाराम महाराज यांच्यानंतर छत्रपती शाहू महाराज व महाराणी येसूबाई मुघलांच्या कैदेत असताना नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती. अशा बिकट काळात आपल्या चार वर्षांच्या पुत्राला गादीवर बसवून त्यांनी औरंगजेबाशी थेट लढा दिला. अवघ्या सहा महिन्यांत तब्बल १९ लढाया जिंकून त्यांनी स्वराज्याचा दरारा पुन्हा निर्माण केला. महिलांनी त्यांच्या पराक्रमातून जिद्द, रणकौशल्य आणि नेतृत्वगुण आत्मसात करावेत, असे आवाहन त्यांनी केले. मराठा सेवा संघाच्या जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सीमाताई तायडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रभा बाळसराफ, डॉ. आरती ठाकरे, डॉ. मोनिका गायकवाड, डॉ. वंदनाताई मोरे आदी उपस्थित होत्या. महानायिकांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून महापौर शारदा खेडकर, नगरसेविका सुवर्णा काळे, योगिता पावसाळे, राखी महल्ले आदी उपस्थित राहणार आहेत. या व्याख्यानमालेचा मातृशक्तीसह समाजबांधवांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले. कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यादरम्यान मान्यवरांच्या अनमोल मार्गदर्शनामुळे हा सोहळा उत्साहात पार पडला. स्वराज्यासाठी होती प्रचंड तळमळ महाराणी ताराबाई या छत्रपती राजाराम यांच्या पत्नी व स्वराज्याचे सेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या होत्या. स्वराज्याच्या जडणघडणीमध्ये महाराणी ताराबाई यांचा सिंहाचा वाटा होता. शंभू पुत्र शाहू महाराज व महाराणी येसूबाई या मोगलांच्या कैदेत असताना स्वराज्यातील संकटाच्या मालिकेत पराक्रमी नेतृत्वाची गरज असताना महाराणी ताराबाईंनी ती गरज पूर्ण करून स्वराज्याला सावरून धरण्याचे कार्य केले. आपल्या चार वर्षाच्या मुलाला गादीवर बसवुन औरंगजेबाशी लढा दिला. अवघ्या सहा महिन्यात १९ यशस्वी लढाया करून मुलुख परत मिळवला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *